मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल 13 जून रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यामध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत 99 टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळवले आहेत.


सातारा जिल्ह्यातील अनंत हायस्कूलच्या वृषाली तिखे या विद्यार्थीनीने 500 पैकी 496 गुण म्हणजेच 99.20 टक्के गुण मिळवले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील फाटक शाळेच्या अथर्व भिडेने 500 पैकी 495 म्हणजे 99 टक्के गुण मिळवत आहेत.

महाराष्ट्रातील गुणवंत :

  • सातारा - अनंत हायस्कूलच्या वृषाली तिखेला 500 पैकी 496 गुण - 99.2%

  • रत्नागिरी - फाटक शाळेच्या अथर्व भिडेला 500 पैकी 495 गुण - 99%.

  • अकोला - बाल शिवाजी शाळेतील आरोही खोडकुंभेला 500 पैकी 494 गुण - 98.8%.

  • नागपूर - सोमलवार रामदासपेठ शाळेतील आदित्य लोटेला 500 पैकी 494 गुण - 98.8%.

  • नागपूर - सोमलवार रामदासपेठ शाळेतील रुचिका गिरडेला 500 पैकी 490 गुण - 98%.

  • अकोला - बाल शिवाजी शाळेतील प्रियांका डबीरला 500 पैकी 491 गुण - 98.2%.

  • नागपूर - सोमलवार रामदासपेठ शाळेतील साहिल पुरोहितला 500 पैकी 487 गुण - 97.4%

  • गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरसवती विद्यालयातील प्रांजली कोचेला 500 पैकी 487 गुण - 97.4%