Thane News : ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (Sandip Malvi) यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून (Thane Sessions Court) अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2015 साली बेकायदा गाळ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. या प्रकरणी 2018 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर, तसेच त्यावर चार्जशीट दाखल झाल्यानंतर कोर्टाने समन्स पाठवून हजर न झाल्याने हा अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे समजते.
माळवी यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद
2015 सालीच्या ठाणे महानगरपालिकेतील वर्धापनदिनी देण्यात आलेले पुरस्कार चुकीच्या व्यक्तींना दिला असल्याचा आरोप सुभाष ठोंबरे यांनी केला होता. याच प्रकरणाची माहिती घेत असताना संदीप माळवी यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी 2018 साली गुन्हा नोंद करण्यात आला. तर संदीप माळवी यांनी देखील 2015 साली सुभाष ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. संदीप माळवी यांच्यासोबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अविनाश रणखांब आणि इतर 5 जणांचे देखील अटक वॉरंट जारी करण्यात आले. तक्रारदार संदीप माळवी आणि तक्रारदार सुभाष ठोंबरे यांनी एकमेकांविरोधात गुन्हा नोंद केल्याने कोर्ट या प्रकरणावर निर्णय देणार आहे.
'या' पाच जणांवर अटक वॉरंट जारी
काही वर्षांपूर्वी बेकायदा गाळ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असून न्यायमूर्तींनी संदीप माळवी, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्यासह अन्य पाच जणांवर अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश नौपाडा पोलिसांना दिले आहेत.
वारंवार समन्स बजावूनही अधिकारी सुनावणीसाठी हजर राहत नव्हते
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात नौपाडा परिसरात रस्ते रुंदीकरणाची मोहीम सुरू होती. या वेळी कारवाईसाठी गेलेल्या संदीप माळवी आणि गाळेधारक सुभाष ठोंबरे यांची बाचाबाची झाली. त्यावेळी माळवी यांनी मारहाण केल्याची तक्रार ठोंबरे यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तेव्हापासून हे प्रकरण ठाणे न्यायालयात सुरू होते. वारंवार समन्स बजावूनही अधिकारी सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने न्यायालयाने अखेर अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश नौपाडा पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, हे जामीनपात्र अटक वॉरंट असून न्यायालयाने पोलिसांना सर्व आरोपींना 3 फेब्रुवारी 2023 ला न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे.
इतर बातम्या
20 December Headlines : ग्रामपंचायत निवडणूक निकाल, विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज दिवसभरात