Temple Reopen LIVE UPDATES: धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली, पाहा प्रत्येक ठिकाणचे लाईव्ह अपडेट्स

Temple Reopen LIVE UPDATES: राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Oct 2021 11:40 AM
भंडारा जिल्ह्यात मंदिरे उघडताच भाविकांची गर्दी  

देशभरात कोरोना संसर्गामुळे धार्मिक स्थळ मंदिर बंद होती. त्यामुळे अनेक भाविक भक्तांना दर्शन घेता येत नव्हते. मात्र कोरोनाने काढता पाय घेतल्याने राज्यसरकारच्या आदेशानंतर तब्बल दीड वर्षानंतर नवरात्रीचा घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आज राज्यातील सर्व मंदिराचे दार उघडण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मोहाडी शहरातील माँ चौंडेश्वरी देवीचे मंदीर तब्बल दीड वर्षांनंतर उघडण्यात आले असून  आज मंदिर उघडल्याने भाविकांनी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी  गर्दी केली होती. 

ज्यांनी कुणी मंदिरात विना परवानगी प्रवेश केला असेल त्यांच्यावर कारवाई करणार,उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची माहिती

ज्यांनी कुणी मंदिरात विना परवानगी प्रवेश केला असेल त्यांच्यावर कारवाई करणार,उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची माहिती


भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या प्रवेशावरून जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया


नियम सर्वांना सारखे आहेत जर कोणी त्याचे उल्लंघन केले असेल तर स्वतः तपासून कारवाई करणार


 

भिवंडी शहरातील वऱ्हाळ माता मंदिरात कोरोनाचे नियम पालन करून दर्शन


 कोरोनाच्या काळात मागच्या दीड वर्षांपासून भाविक भक्तांसाठी बंद असणारे देवस्थान आजपासून भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने घटस्थापनेच्या दिवशी देवस्थान उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भिवंडी शहरातील सुप्रसिद्ध वऱ्हाळ माता मंदिर भक्तांच्या  दर्शनासाठी खुली करण्यात आली . यावेळी मंदिराची सजावट करण्यात आली तसेच गाभाऱ्यात झेंडूच्या फुलाने वऱ्हाळ देवी मातेची मूर्ती सजवण्यात आली होती . मंदिर प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या दृष्टीने  शोसल डीस्टसिंग , सॅनिटाईझ  करून रांगेत देवीच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे .  राज्य सरकारने मंदिर उघडे असले तरी भाविकांनी  कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे 

 विरारचं प्रसिध्द जीवदानी देवी मंदिर भक्तांसाठी खुलं

मुंबईच्या वेशीवर असलेलं विरारचं प्रसिध्द जीवदानी मातेचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुल करण्यात आलं आहे. सकाळी 6 वाजता मंदिराचे गेट उघडून भाविकांना प्रवेश दिला आहे. आता नऊ दिवस भाविकांची मंदियाळी येथे पाहायला मिळणार आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना देवीचं दर्शन देण्यात येत आहे. दुस-या लाटेवेळी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे आजपासून घटस्थापनेच्या दिवशी खुली करण्यात आली आहेत.  विरारचं जीवदानी देवी मंदिर देवस्थान हे लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जागतिक कोरोना महामारी बंद असणारे देवस्थान आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सुरू झाल्याने भाविक भक्ता सह मंदिर व्यवस्थान समितीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने कोरोनाचे जे सर्व नियम घालून दिलेत ते सर्व नियम पाळून जीवदानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सोडलं जात आहे. 

जेजुरी गडावर खंडेरायाच्या नवरात्रौत्सवास आरंभ
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावर खंडेरायाच्या मुख्य मंदिरात बुधवारी आज नित्य वारकरी सेवेकरी यांच्या हस्ते पाकाळणी करण्यात आली. गाभारा स्वच्छता व मूर्तींना नवे पोशाख परिधान करून मुख्य उत्सवमूर्ती बालद्वारीत वाजत गाजत आणण्यात आल्या. त्यानंतर धार्मिक विधी -वेदपठण व घडशी समाज बांधवांच्या सनई -चौघडा वादनात सालाबादप्रमाणे पुजारी सेवेकरी ,मानकरी ,ग्रामस्थ देवसंस्थान विश्वस्त ,अधिकारी ,कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली आणि अवघ्या जेजुरी शहर व पंचक्रोशीतील घराघरात घटस्थापना होत नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.. 

 
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक स्वयंभू पीठ माहुरनिवासींनी रेणुका देवीला 14 अलंकाराचा साज
साडे तीन शक्ती पीठांपैकी एक पुर्ण आणि स्वयंभू पीठ असलेल्या माहुरनिवासींनी रेणुका देवीला 14 अलंकाराचा साज चढवण्यात आलाय.नवावरी,छत्र,टोप,कानातील कुंडल,आदी पुरातन आभूषण देवीला घालण्यात आली असुन घटस्थापना ही करण्यात आलीय.माहुरगड संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र ज्ञायाधीश के एन गौतम यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करून मंत्रोपचार करून विधिवत घटस्थापना करण्यात आलीय..तसेच महाआरती ही संपन्न झालीय..नेमके काय काय आभूषण रेणुका देवीला चढवण्यात आलेत 

 
कोकणवासीयांची कुलस्वामिनी योगेश्वरी देवी, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई वास्तव्यास, नवरात्र महोत्सव आरंभ

कोकण वासियांची कुलस्वामिनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी च्या मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली..बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई वास्तव्यास असणाऱ्या योगेश्वरी देवीचे मूळ कोकणातील आहे.. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी कोकणातून मोठे भाविक दर्शना साठी येत असतात..कोरोनामुळे दीड वर्ष हे मंदिर बंद होते..अंबाजोगाईचे तहसीलदार बिपीन पाटील यांनी योगेश्वरी देवीची घटस्थापना सपत्नीक केली.. पुढचे नऊ दिवस योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव असणार आहे..

मुंबईची ग्राम देवता मुंबादेवी

मुंबईची ग्राम देवता मुंबादेवी. मुंबईच्या काळबादेवी परिसरात सुमारे दोनशे वर्षांपासून वास करीत असलेली आगरी कोळी बांधवांची देवी. सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी मुंबई च्या तेव्हाच्या व्हिटी आणि आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या देवीचे मूळ ठाणे होते.नंतर ही देवी धोबीतलाव येथे आणण्यात आली आणि तिथून अखेर दोनशे वर्षांपूर्वी मुंबई मधील कोळी आगरी बांधवांनी काळबादेवी परिसरात सुंदर मंदीर बांधून तिची कायमस्वरूपी स्थापना केली.आता या ठिकाणी मुंबादेवी सह जगदंबा आणि अन्नपूर्णा देवी ची ही स्थापना करण्यात आली आहे.दररोज या मंदिरात वीस ते पंचवrस हजार आणि उत्सव काळात अगदी लाखात भाविक दर्शनास येत असतात.कोळी बांधवांची असलेली ही देवी आता सर्व मुंबईकरांची देवी असून मुंबईकरांसह संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात

नवरात्र उत्सवा पासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पहाटे घटस्थापना करण्यात आली यानंतर देवीची विधिवत पूजा करून भाविकांसाठी मंदिर सुरू करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून दर दोन तासांनी मंदिराची साफसफाई करण्यात येत आहे तसेच भाविकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून दहा वर्षाच्या आतील व 65 वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. 

नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात देवीचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा

आजपासून मंदिरे खुली करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात देवीचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. पहाटे ५ वाजता ईथे घटाची स्थापना करण्यात येऊन त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी टोकन बंधनकारक करण्यात आले असून एका तासात 60 भाविकांनाच प्रवेश दिला जात असल्याने गर्दीही होत नसून भाविकांनाही शांततेत दर्शनाचा लाभ मिळतोय.  

 अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर दीड वर्षांनंतर उघडले, भाविकांमध्ये उत्साह
जवळपास दीड वर्षांपासून बंद असणारी महाराष्ट्रातील धार्मिकस्थळ आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर देखील आज पहाटेपासून खुले करण्यात आले आहे. मंदिरातील एका दिव्यांग सेवेकरांच्या हस्ते मंदिराचा प्रवेशद्वार उघडण्यात आलं. पहाटे पाच वाजता काकड आरती झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून भक्तांसाठी मंदिराची दार उघडण्यात आली आहेत.

 
कोकनवासीयांची कुलस्वामिनी योगेश्वरी देवी

कोकण वासियांची कुलस्वामिनी अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवी च्या मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई वास्तव्यास असणाऱ्या योगेश्वरी देवीचे मूळ कोकणातील आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी कोकणातून मोठे भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे दीड वर्ष हे मंदिर बंद होते. अंबाजोगाईचे तहसीलदार बिपीन पाटील यांनी योगेश्वरी देवीची घटस्थापना सपत्नीक केली.. पुढचे नऊ दिवस योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव असणार आहे.


योगेश्वरी देवीच्या या मंदिराला तीन द्वार आहेत. हे मंदिर नेमके कोणत्या दशकात बांधले गेले याचा कोणताही पुरावा उपलब्द नाही मात्र या मंदिराचे असलेले हेमांडपंती बांधकाम हे बाराव्या शतकाच्या आधीचे असल्याचा दाखला हे लोक देतायेत. योगेश्वरी मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदिर उत्तरभिमुख आहे, मंदिराच्या भोवतीदोन परकोटा आहेत ,महाद्वार असून आत नगारखाना आहे. पूर्वाभिमुख दीपमाल असूनएक वैभवशाली शिखर आणि लहान लहान चार शिखरे लक्ष वेधुन घेतात. राज्यातील इतर मंदिरा प्रमाणे या हि मंदिरा चा जीर्नोद्दार हा आहिल्यादेवी होळकर यांनी केलाय. 

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिर भावीकांसाठी खुले

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा दुर्गाडी किल्ला आहे. याचं किल्ल्यावर असलेले दुर्गाडी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. नवरात्रीच्या काळात कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर कल्याणच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून दुर्गाडी देवीच्या दर्शनसाठी भक्तांची गर्दी होते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत मंदिरात मोठा उत्सव भरतो. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे मंदिरे बंद होती. त्यामुळे भक्तांना दर्शन घेता येत नव्हते. आज आजपासून मंदिरं भाविकांना दर्शनसाठी सुरु झालीत. या पार्श्वभूमीवर दुर्गाडी मातेच्या मंदिरात देवीला फुलांची आकर्षक सजावट करन्यात अली आहे. या मंदिरात देखील देवीच्या दर्शनासाठी भक्त सकाळपासून येत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 



 


 
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिर भाविकांसाठी खुले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा दुर्गाडी किल्ला आहे. याच किल्ल्यावर असलेले दुर्गाडी मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. नवरात्रीच्या काळात कल्याणच्या  दुर्गाडी किल्ल्यावर कल्याणच नव्हे तर  ठाणे जिल्ह्यातून दुर्गाडी देवीच्या दर्शनसाठी  भक्ताची गर्दी होते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत मंदिरात मोठा उत्सव भरतो. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे मंदिरे बंद होती. त्यामुळे भक्तांना दर्शन घेता येत नव्हते.आज आजपासून मंदिरे भाविकांना दर्शनासाठी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर दुर्गाडी मातेच्या मंदिरात देवीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे .या मंदिरात देखील देवीच्या दर्शनासाठी भक्त सकाळपासून येत आहेत  कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे .मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रेणुका देवीचा माहुरगड भक्तांनी फुलला 

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भक्तांसाठी खुल करण्यात आलंय.पहाटे पासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलीय.मंदिर प्रशासनाकडुन भक्तांना विना मास्क परवानगी दिली जात नसून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे..नवरात्री निमित्त मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आलीय.

साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरात घटस्थापना

साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाली आहे. ही घटस्थापना होताच अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या तोफखाना इथं तोफ उडवून घटस्थापना झाल्याचं संदेश करवीर नगरीला देण्यात आला.. गेल्या अनेक दशकापासून ही परंपरा असून आज देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफ उडवली

पुण्यातील देहू आणि आळंदीची मंदिर आज पुन्हा खुली





अखंड महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले पुण्यातील देहू आणि आळंदीची मंदिर आज पुन्हा खुली होतायेत. कोरोना नियमांना अधीन राहत, संत तुकोबारायांच्या आणि संत ज्ञानोबांच्या मंदिरात दर्शन बारी सुरू करण्यात आली. कोरोनाने शिरकाव केल्यापासून दोन्ही पालखे सोहळे, संजीवन समाधी सोहळे अन अनेक एकादशीवेळी वारकरी दर्शनाला मुखलाय. पण आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सरकारने त्यांची ही प्रतीक्षा मिटवली आणि त्यांची त्यांच्या माऊलींशी भेट घडवून आणली. पण निर्बंधांचे पालन करूनच भाविक आणि वारकरी दर्शन घेतायेत. असं असलं तरी यातच समाधान मानून देवस्थान आणि भाविकांनी सरकारचे आभार मानलेत. 


 

 



 


माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर हे 2 वर्षानंतर उघडले

साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर हे 2 वर्षानंतर उघडले आहे.त्यातच आज नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्याने माहूरगडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी ही लक्षणीय आहे.अनेक जिल्ह्यातून महिला भक्त हया दर्शनासाठी दाखल।झाल्या आहेत..त्यांनी मंदिर उघडण्याच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलंय.

जेजुरीचं खंडेरायाचं मंदिर दर्शनासाठी खुलं
अनेक दिवसापासून बंद असलेली मंदिरे उघडल्याने भाविकांनी दर्शनासाठी तुरळक प्रमाणात गर्दी केलीये आहे. जेजुरीचं खंडेरायाचं मंदिर सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलंय.. भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गर्भवती महिला तसेच 10 वर्षातील मुले आणि 65 वर्षावरील वृद्धांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. 
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलं सपत्नीक रेणुका देवीचे दर्शन
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहूर गडावर जाऊन सपत्नीक रेणुका देवीचे दर्शन घेतले.यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारने सगळे निर्णय चुकीचे घेतले आहेत.आज सर्वच विभागात शेतकरी अडचणीत आहेत ना मदत दिली जाते ना कुणी यावर बोलतोय..उठलं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे एवढाच उद्योग सरकारला राहिलाय. 

 
आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर आज सकाळी दर्शनासाठी खुले
गेल्या अठरा महिन्यापासून राज्यातील संपूर्ण मंदिरे बंद ठेवण्यात आली होती . घटस्थापनेच्या दिवशी राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील संपूर्ण मंदिरे आज दर्शनासाठी खुले करण्यात आली. त्यानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे मंदिर सुद्धा आज सकाळी दर्शनासाठी खुले करण्यात आले.  
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे धनंजय मुंडेंनी घेतले दर्शन

राज्यातील मंदिरे आज पासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी वैजनाथ या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या भागाचे आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले.


कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर दर्शन घेताना सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले.


शहरातील काळरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले

गेल्या वर्षभरापासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.राज्य सरकारने अटी शर्ती देऊन मंदिर खुली करण्यास परवानगी दिली मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला पाहायला मिळाला. 

शेगावचं गजानन मंदिर ऑनलाइन पास काढलेल्या भक्तांसाठी खुलं
 

विदर्भाची पंढरी असलेल्या व राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेलं बुलडाण्यातील शेगावचं संत गजानन महाराज मंदिर आज सकाळी 5 वाजेपासून ऑनलाइन पास काढलेल्या भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज गुरुवार असल्याने व पहिला दिवस असल्याने तीन दिवस आधीच आजच ऑनलाइन दर्शनाचं बुकिंग हाऊसफुल झालं आहे. त्यामुळे भक्तांनी निर्धारित वेळेत दर्शनासाठी पोहचणे पसंत केलं. सकाळी 4.30 वाजेपासूनच भक्त रांगेत उभे आहेत.  
विठ्ठल मंदिर झाले भाविकांसाठी खुले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 

 


आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत . मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या  लाडक्या  विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे . या रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .

तुळजाभवानी मंदिरात उत्सव काळात रोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश

उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आजही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन 

आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे. 

रेणुका देवीचा माहुरगड भक्तांनी फुलला 

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात आलंय.पहाटेपासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलीय.मंदिर प्रशासनाकडून भक्तांना विना मास्क परवानगी दिली जात नसून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नवरात्री निमित्त मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आलीय. 

पार्श्वभूमी

Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. 


मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन 
आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.


तुळजाभवानी मंदिरात उत्सव काळात रोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश


उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.


विठ्ठल मंदिर झाले भाविकांसाठी खुले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 


आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत . मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या  लाडक्या  विठुरायाचे सावळे रूप  आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे . या रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .


राज्यभरातील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून खुली केली जाणार आहे. त्याचबरोबर आजपासून नवरात्री उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले आहे रोषणाई केली जाते तब्बल दोन वर्षांनंतर मंदिरामध्ये जाऊन भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहेत. पुण्यातील सारसबागेच्या समोर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आलेली आहे आणि खास व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून भाविकांना सहजपणे मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येईल. 


उद्यापासून आदिशक्तीचा जागर सुरू होतोय. घटस्थापनापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आज ही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.


मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन 
आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.  मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे. 


विठ्ठल मंदिर झाले भाविकांसाठी खुले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 


आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत . मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या  लाडक्या  विठुरायाचे सावळे रूप  आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे . या रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .


राज्यभरातील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून खुली केली जाणार आहे. त्याचबरोबर आजपासून नवरात्री उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले आहे रोषणाई केली जाते तब्बल दोन वर्षांनंतर मंदिरामध्ये जाऊन भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहेत. पुण्यातील सारसबागेच्या समोर असलेल्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आलेली आहे आणि खास व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून भाविकांना सहजपणे मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येईल. 


उद्यापासून आदिशक्तीचा जागर सुरू होतोय. घटस्थापनापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आज ही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. 


 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.