MaharashtraTemperatureNews :दिवसेंदिवसराज्याततापमानाचा (Temperature) पारावाढतअसल्याचंचित्रपाहायलामिळतआहे. वाढत्यातापमानाचामोठात्रासलोकांनासहनकरावालागतआहे. राज्यातीलतापमानाचापारा45 अंशावरगेलाआहे. अकोल्यातविक्रमी45अंशतापमानाचीनोंदझालीआहे. त्याचबरोबरराज्यातीलअनेकशहराततापमानाचापारा40अंशाच्यापुढेगेलाआहे. तापमानात वाझ झाल्यामुळं अनेक जिल्ह्यातील शाळांच्या वेळामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. कोणत्याजिल्ह्यातकितीतापमानाचीनोंदझालीतेपाहुयात.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमान

अकोला - 45

अमरावती - 44.8

चंद्रपूर - 44

गडचिरोली - 44

यवतमाळ - 44

वर्धा - 44.4

नागपूर - 44.4

ब्रह्मपुरी - 44.7

गोंडिया - 44.2

वाशिम - 48.6

बुलढाणा - 48.5

माथेरान - 48.6

जालना - 48.6

बीड - 48.5

उदगीर - 48.4

मालेगाव - 48.6

नाशिक - 48.6

संभाजीनगर - 48.6

धाराशिव - 48.4

सातारा - 48.9

रत्नागिरी - 48.3

नवी मुंबई - 48.2

परभणी - 48

पुणे - 9.9

सांगली - 9.8

मुंबई - 9.6

गोंदिया जिल्ह्याचे तापमान 43.02 अंश सेल्सिअस, कडाक्याच्या उन्हाने गोंदिया जिल्हावासीय हैराण

गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज तापमानाने 43.02 अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून नागरिकांनी आवश्यक काम असल्यावरच घराबाहेर पडावे व उन्हापासून बचाव करण्याकरिता रुमाल, गमजाचा वापर करावा. तसेच भरपूर प्रमाणात शीतपेय ग्रहण करावे असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्यात 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग 30 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो, त्यामुळे शेती व झाडांना काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा प्रभाव कायम

महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

शेतकऱ्यांसाठी सूचना

हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे, जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. नव्या लागवडीवर सावलीसाठी जाळी (shade net) वापरावे, असे सूचवण्यात आले आहे.