Uday Samant on Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरुन वादात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड यांनी त्या पुस्तकाबाबत नेमकी कशाबाबत भूमिका मांडली, याबाबत त्यांच्याशी बोलावे लागेल. संजय गायकवाड यांनी ते पुस्तक वाचलं की नाही माहीत नाही. मी माहिती घेऊन त्यांना काय आक्षेपार्ह वाटलं ते विचारेल, मी देखील पुस्तक वाचतो असे उदय सामंत म्हणाले. 

Continues below advertisement

मराठी प्रवाशांसोबत बोलताना टॅक्सी चालकाला मराठी भाषा आली तर सोयिस्कर होईल

शिवाजी कोण होता? हे पुस्तक मी देखील वाचलेले नाही, पुस्तक वाचलं की त्यांची भूमिका कशाबद्दल होती याबाबत चर्चा करेल असे उदय सामंत म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी माणसाला दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. मराठीबाबत त्यांनी जबरदस्ती केलेली नाही. मराठी प्रवाशांसोबत बोलताना टॅक्सी चालकाला मराठी भाषा आली तर सोयिस्कर होईल असे उदय सामंत म्हणाले. राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. त्यांना जे आवश्यक आहे ते या आधी करुन दिलं आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु असे सामंत म्हणाले. 

महाविकास आघाडीत काय होतं ते ठरु द्या, आम्ही सज्ज

विधानपरिषदेच्या निवडुकीसंदर्भात देखील उदय सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीत काय होतं ते ठरु द्या. आम्ही सज्ज आहोत. तापमान वाढीवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सामंत म्हणाले. बारामती अँग्रीकल्चर ट्रस्ट सोबत चर्चा करून काजू आणि आंबा पिकावर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे सामंत म्हणाले.

Continues below advertisement

महासत्ता असलेल्या देशाच्या पंतप्रधानाने 24 तासात ट्विट बदललं हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश असल्याचे उदय सामंत म्हणाले. केमिकल मिश्रित पाणी नागरिकांच्या पाण्यात मिसळून जनतेला त्रास होत असेल तर अशा कंपन्या बंद करून त्यांना एक संधी दिली जाईल. मात्र त्यांनी उपाययोजना न केल्यास संबंधित कंपन्या कायमच्या बंद करु असे उदय सामंत म्हणाले.