Temperature today: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पहायला मिळत आहे. तापमानातल्या तीव्र बदलांमुळे नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचं सावट आहे. राज्यात मागील चार दिवसांपासून वाढलेल्या गारठ्यानं नागरिक कुडकुडत आहेत. अनेक भागांत तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. पहाटेच्या वेळी दाट धुकं होतं. आजपासून राज्यात किमान तापमानात वाढ होणार असून 2-3 अंशांनी तापमान वाढणार आहे. दरम्यान, सकाळपासून कुठे काय तापमान नोंदवलं गेलं पाहूया.. (Maharashtra Weather)
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा किती?
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट होती. आज शनिवारी पुण्यात 12 ते 16 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. नगर, नाशिकमध्ये 12-13 अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले. बहुतांश मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात काहीशी वाढ झाली आहे.
कुठे किती तापमान?
कोल्हापूर -
min - 17
max - 31
रत्नागिरी -
min - 21
max - 33
पुणे -
min - 17
max - 31
मुंबई-
min - 23
max - 31
नाशिक-
min - 16
max - 31
जळगाव -
min - 17
max - 32
छ संभाजीनगर-
min - 15
max - 30
नांदेड-
min - 17
max - 32
अमरावती-
min - 14
max - 30
नागपूर-
min - 16
max - 28
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे. विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय . प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 10 जानेवारी व 11 जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे .(Unseasonal Rain)
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम चक्रवतामुळे वातावरणात बदल होत असून, दक्षिण-पूर्व इराण आणि आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातही कमी उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा समन्वय होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे. किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
हेही वाचा:
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, गारठा प्रचंड वाढला, IMDने तापमानाबाबत काय दिलाय इशारा?