मुंबई : एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला ठेंगा मिळाल्याची चिन्हं असताना दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरावर आहे. येत्या 7 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पक्का करण्यात आलाय.

 
यावेळी एकूण नऊ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यापैकी 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर दोघे जण शिवसेनेचे असतील असंही सांगितलं जात आहे.

 
मंत्रिमंडळात कोणाच्या वर्णीचे संकेत?

 
मित्रपक्ष :

 
सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे

 

शिवसेना :
गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर

 

 

भाजप :

 
पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता. यामध्ये सुरेश खाडे यांचं नाव फायनल होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव नाईक यांचं नावही आघाडीवर आहे.

 
मराठवाड्यातून सुधाकर भालेराव, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावं चर्चेत

 

 

विदर्भातून पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर यांची नावं आघाडीवर

 

 

उत्तर महाराष्ट्रातून जयकुमार रावल यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, हरिभाऊ जावळेंच्या नावाचीही चर्चा

 
मुंबईतून एक मंत्रिपद असून ते महापालिका निवडणुकीनंतर भरण्यात येणार आहे

 

 

संबंधित बातम्या :


 

आठवलेंचं स्वप्न पूर्ण, भामरेंची सरप्राईज एण्ट्री


केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही : उद्धव ठाकरे