यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, ॲड. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, प्रा. डॉ. अशोक उईके, प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
तर राज्यमंत्री म्हणून सर्वश्री योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय (बाळा) भेगडे, डॉ. परिणय फुके आणि अतुल सावे यांनी शपथ घेतली. महातेकर यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर अन्य सदस्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली.
शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता कुठलं खातं मिळणार अशी चर्चा सुरु आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना पणन, राज्य उत्पादन शुल्क, मदत पुनर्वसन खातं मिळण्याची शक्यता आहे. तर आशिष शेलार यांना महेतांच्या जागी गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
तर विदर्भातील डॉ. अनिल बोंडे यांना कृषी खातं मिळण्याची चिन्हे आहेत. नुकतेच शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षिरसागर यांना सार्वजनिक आरोग्य खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या खात्याची अतिरिक्त जबाबदारी सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य खातेवाटप
कॅबिनेट मंत्री :-
1) राधाकृष्ण विखे पाटील - (जिल्हा - अहमदनगर) (भाजपा) : पणन / राज्य उत्पादन शुल्क / मदत पुनर्वसन
2) जयदत्त क्षिरसागर - (जिल्हा - बीड) (शिवसेना) - सार्वजनिक आरोग्य
3) आशिष शेलार (जिल्हा - मुंबई) (भाजपा) - गृहनिर्माण
4) डॉ. संजय कुटे (जिल्हा - बुलडाणा) ( भाजपा) - ???
5) डॉ. सुरेश खाडे (जिल्हा - सांगली) (भाजपा) - सामाजिक न्याय विभाग
6) डॉ. अनिल बोंडे (जिल्हा - अमरावती) (भाजपा) - कृषी
7) डॉ. अशोक उईके (जिल्हा - यवतमाळ) (भाजपा) - आदिवासी विकास
8) डॉ. तानाजी सावंत (जिल्हा - यवतमाळ) (शिवसेना) - ???
राज्यमंत्री
1) योगेश सागर (जिल्हा - मुंबई) (राज्यमंत्री) (भाजपा) - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
2) अविनाश महातेकर (जिल्हा - मुंबई ) (आरपीआय) - सामाजिक न्याय राज्यमंत्री
3) संजय भेगडे ( जिल्हा - पुणे) (भाजपा) - ???
4) डॉ. परिणय फुके (जिल्हा - भंडारा) ( भाजपा) - आदिवासी विकास व वने राज्यमंत्री
5) अतुल सावे (जिल्हा औरंगाबाद) ( भाजपा) - अल्पसंख्याक राज्यमंत्री
नव्या मंत्र्यांचा थोडक्यात परिचय
राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
राज्याच्या राजकारणातील मोठं नाव
काँग्रेसच्या काळात शिक्षण, दळणवळण, कृषी मंत्री
2014 ते 4 जून 2019 पर्यंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते
उद्योग, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव काम
काँग्रेसच्या राजीनामा देऊन भाजपशी जवळीक
आशिष शेलार (भाजप)
अभाविप सचिव, भाजयुमो अध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात
मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम
सध्या वांद्रे पश्चिम मधून आमदार
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तुल्यबळ टक्कर
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
मराठवाड्यातील मोठं राजकीय नाव
पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
आघाडी सरकारच्या काळात अनेक मंत्रिपदं भूषवली
उर्जा, पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश
तानाजी सावंत (शिवसेना)
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे शिक्षण क्षेत्रात मोठं नाव
शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार
शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख
‘शिव जल क्रांती’च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात काम
अतुल सावे (भाजप)
सवेरा ग्रुप ऑफ कंपनीद्वारे उद्योग क्षेत्रात काम
औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून काम
सध्या औरंगाबाद पूर्वमधून आमदार
सुरेश खाडे (भाजप)
सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम
सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजप रुजवण्याचं काम
सलग तीन वेळा भाजपकडून आमदार
परिणय फुके (भाजप)
वयाच्या 26 व्या वर्षी नागपूर नगरपालिकेत नगर सेवक
2016 मध्ये भाजपकडून विधानपरिषदेवर
मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख
अविनाश महातेकर (भाजप)
दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य
1990 मध्ये प्रकाश आंबेडकरांना सोडून आठवलेंच्या गटात
भारिप बहुजन महासंघाचे सचिव म्हणून काम
रिपब्लिकर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस
आरपीआयची थिंक टँक म्हणून ओळख
अनिल बोंडे (भाजप)
मोर्शी मतदार संघातून आमदार
2002 ते 2005 पर्यंत अमरावती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष
2009 शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं अपक्ष म्हणून रिंगणात आणि विजयी
26 ऑगस्ट 2014 मध्ये भाजपात प्रवेश
संजय उर्फ बाळा भेगडे (भाजप)
मावळ मतदारसंघात भाजपकडून सलग दोन वेळा आमदार
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस
योगेश सागर (भाजप)
चारकोप मतदारसंघातून भाजपचे आमदार
सलग दोन वेळा विधानसभेवर
विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून उत्तम काम
डॉ. संजय कुटे (भाजप)
जळगावच्या जामोद मतदारसंघातून विधानसभेचे आमदार
2014 मध्ये महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस
2010 मध्ये बुलडाणा भाजपचे अध्यक्ष
डॉ. अशोक उईके (भाजप)
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार
नगरसेवक ते आमदार आता मंत्री असा प्रवास
बुलढाणा नगरपालिकेत 1998 साली नगरसेवक
विधिमंडळच्या आदिवासी विकास समितीचे प्रमुख
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शिवाजी शिक्षणसंस्थेतील कॉलेजचे प्राचार्य सुद्धा
सर्व सामान्य कार्यकर्त्यांत मिसळणारे म्हणून त्यांची ओळख