मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.


पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.


गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत


पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.


महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच तेच अधिवेशनाला येता येणार आहे. राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35 हून अधिक आमदार, मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली. त्यातून काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू आहेत.


VIDEO | #Coronavirus विधिमंडळातील 37 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह



अधिवेशनासाठी सरकारकडून खास उपाययोजना


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले जाईल. तसेच अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे.
विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत.


अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. आमदार आणि मंत्री यांना फक्त एकच पीए हा विधिमंडळात बरोबर आणण्याची परवानगी दिलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या स्टाफच्या जेवणाची सोय देखील विधी मंडळाच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्शवभूमीवर होणारे अधिवेशन हे जितके आव्हानात्मक आहे तितकेच ते वेगळे ठरणार आहे.


महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधित झालेले लोकप्रतिनिधी


विधानसभा अध्यक्ष : नाना पटोले


मकरंद पाटील - राष्ट्रवादी
किशोर जोरगेवार - अपक्ष
ऋतुराज पाटील - काँग्रेस
प्रकाश सुर्वे - शिवसेना
पंकज भोयर - भाजप
माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी
मुक्ता टिळक - भाजप
वैभव नाईक शिवसेना
सुनील टिंगरे - राष्ट्रवादी
किशोर पाटील - शिवसेना
यशवंत माने - राष्ट्रवादी
मेघना बोर्डीकर - भाजप
सुरेश खाडे - भाजप
सुधीर गाडगीळ - भाजप
चंद्रकांत जाधव - काँग्रेस
रवी राणा - अपक्ष
अतुल बेनके - राष्ट्रवादी
प्रकाश आवाडे - अपक्ष
अभिमन्यू पवार - भाजप
माधव जळगावकर - काँग्रेस
कालिदास कोलंबकर - भाजप
महेश लांडगे - भाजप
मोहन हंबरडे - काँग्रेस
अमरनाथ राजूरकर - काँग्रेस
मंगेश चव्हाण - भाजप
गीता जैन -
सरोज अहिरे -


मंत्री


जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी
असलं शेख - काँग्रेस
अशोक चव्हाण - काँग्रेस
धनंजय मुंडे - राष्ट्रवादी
संजय बनसोडे - राष्ट्रवादी
अब्दुल सत्तर - शिवसेना
सुनील केदार - काँग्रेस
बाळासाहेब पाटील - राष्ट्रवादी


विधान परिषद


सदाभाऊ खोत - भाजप
सुजित सिंग ठाकूर - भाजप
गिरीश व्यास - भाजप
नरेंद्र दराडे - भाजप