मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाचे (ST) आर्थिक गणित हे सध्या सुसाट असल्याचं पाहायला मिळतयं. कारण 16 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाने 35 कोटी 18 लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा (Proft) विक्रम रचला आहे. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसांत मिळवलेल्या सर्वाधिक उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे. दरम्यान यामध्ये पुणे (Pune) विभाग हे आघाडीवर आहे. पुणे विभागातून 21 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे. त्याखालोखाल धुळे-नंदुरबार विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 21 कोटी 25 लाखांचे उत्पन्न एसटीने मिळवलंय. तसेच जळगाव विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 18 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. 


राज्यात कोणतीही घडामोड घडली तर त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो. ग्रामीण भागात एसटी हा प्रवाश्यांमध्ये एक महत्त्वाचा स्रोत आहे. पण अनेकदा या एसटीवर संकंट कोसळ्याचं चित्र होतं. पण यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी देखील खास ठरली. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीने कमावलं. 


दिवाळीत एसटीचा प्रश्न मार्गी


सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बंदच्या संपाची हाक दिली होती. पण त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही संप मागे घेण्यात आला. दरम्यान मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.  एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्वाच्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत अनेक निर्णय देखील घेण्यात आले. 


बैठकीत घेण्यात आलेले निर्णय



  • दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे 

  • पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला 

  • बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील 

  • आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 2 हजार 200 नवीन गाड्या येणार 

  • 2025-26 ला 2500 बस येणार

  •  येत्या चार वर्षात एसटीत नऊ हजार बसेस दाखल होतील 

  •  दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील 


सातवा वेतन आयोग, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तूर्तास एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. 


हेही वाचा : 


Navi Mumbai Metro : नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली, स्थानकं, तिकिट दर ते वैशिष्ट्ये सर्व माहिती एका क्लिकवर