दहावीचा निकाल आज, 'या' तीन वेबसाईटवर निकाल पाहा
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2018 02:48 PM (IST)
दहावीचा निकाल 2018 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच शुक्रवार 8 जून 2018 रोजी जाहीर होत आहे.
Maharastra SSC Class 10 Results
दहावीचा निकाल 2018- मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच शुक्रवार 8 जून 2018 रोजी जाहीर होत आहे. बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/ या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल पाहता येईल. तर SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे. राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. अपवादात्मक स्थितीत त्यामध्ये बदल होतो. दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहू शकाल? www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेनंतर, दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. कुठे पाहाल निकाल? http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट : www.mahresult.nic.in www.result.mkcl.org www.maharashtraeducation.com https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ कसा पाहाल निकाल? दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.