Maharashtra SSC HSC Exam Updates : राज्यात कोरोना आणि त्यातल्या त्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Corona Omicron) पार्श्वभूमीवर बोर्डाकडून आपात्कालीन परिस्थितीत दहावी बारावी परीक्षेसोबत मूल्यमापनाच्या इतर पर्यायांच्या तयारी बाबत विचार सुरू आहे. मात्र, बोर्ड सध्यातरी दहावी बारावी नियोजित लेखी बोर्ड परीक्षेवर ठाम आहे.
ओमायक्रॉनचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी बारावी बोर्ड परीक्षेसोबत इतर पर्यायांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाकडे तयार असून सुद्धा अद्याप जाहीर केले गेलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर पुढील आढावा घेऊन आपात्कालीन परिस्थिती वाटल्यास परीक्षेबाबत बोर्डाकडून विचार केला जाईल. लेखी परिक्षेसोबत इतर पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचा बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
मात्र, सध्या कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून शिक्षण विभागाशी चर्चा करून भविष्यातली परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विभागातील सूत्रांनी दिली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मूल्यांकनाच्या पर्यायाची चाचपणी होत असली तरी जोपर्यंत मंडळाकडून अधिकृत वेळापत्रक किंवा सूचना जारी होत नाही तोवर विद्यार्थी पालक, शिक्षकांनी नियमित पद्धतीने परीक्षेची तयारी सुरु ठेवावी असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. तसेच सर्व विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाच्या अधिकृत सूचनेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.
सध्या परीक्षांबाबत फक्त चाचपणी सुरू आहे. जर भविष्यात ओमायक्रॉनमुळे आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मागील वर्षी प्रमाणे ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी निर्णय कुठलाही झालेला नाही. उलट नियोजित परीक्षा घेण्यावर बोर्ड ठाम आहे, अशी देखील माहिती आहे.
संबंधित बातम्या
SSC HSC Fake Time Table : दहावी बारावीच्या परीक्षांचं खोटं वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल ABP Majha