Maharashtra Shivsena Rebel MLA Sanjay Gaikwad Statement : शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले बुलढाण्यातील बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आपल्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. बुलढाण्यात काल झालेल्या राड्या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या शैलीत सेनेतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. कालचा राडा योग्यच होता.  या पुढे उद्धव गटातील कोणीही बोललं की त्यांना चोपच देणार अशी धमकी त्यांनी दिली. मात्र या धमकीपेक्षा संजय गायकवाड यांच्या हिंदीचीच जोरदार चर्चा जिल्हाभरात रंगली आहे.


नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड
'बुलढाणा जिले मे शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे है. आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोक लिया. उनको पता नही है की संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है... ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है..  ये अगर खवळ जाते तो किस्के बाप को बाप समजते नही. अगर इसके बाद इन्होने कुछ भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे. गिन गिन के मारे जायेंगे. वो तो सौभाग्य है की पुलिस बीच मे थी...'


अशा हिंदी भाषेत काल झालेल्या राड्या प्रकरणी संजय गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मात्र या धमकीपेक्षा संजय गायकवाड यांच्या हिंदीचीच जोरदार चर्चा आज जिल्हाभरात रंगली आहे.  


शिंदे गटात सामिल झाल्यानंतर संजय राऊतांवर केले होते गंभीर आरोप
शिंदे गटात सामिल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या लोकांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे देवमाणूस पण त्यांच्या भोवतीचे लोक त्यांना काहीच सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असा दावा संजय गायकवाड यांनी केला होता.  संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, असा खळबजनक आरोप देखील संजय गायकवाड  यांनी केला होता. ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी आम्हालाही आनंद होता, पण कालांतरानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला निधी मिळू दिला नाही, आमच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यामुळे फुटलेले सर्वच आमदार व्यथित होत होते आणि त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असं गायकवाड यांनी म्हटलं होते.  


इतर महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election 2022 : ...म्हणून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी फाईव्ह स्टार हॉटेल सोडलं!


MLA Sanjay Gaikwad : उपवासाऐवजी मांसाहार करा, कोरोनाला हरवा, आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर वारकऱ्यांचा आक्षेप