दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.












1. टी-20 आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, सामना जिंकून फायनल गाठण्याची भारताला संधी, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर


आशिया चषक टी-20  (Asia Cup T20)स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. आशिया चषकातील सुपर फोर लीगच्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून टी-20  विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. आता आशिया चषक टी-20 स्पर्धेत अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला आजची कठीण परीक्षाही पास करावी लागणार आहे.


साखळी सामन्यातील विजयात मोलाची कामगिरी बजावणार रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायची की रिषभ पंतच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज खेळवायचा याचा फैसला संघ व्यवस्थापनाला करायचा आहे. शिवाय रोहित, राहुल यांनाही कामगिरीत सुधारणा करावी लागेल. दुसरीकडे हाँगकाँगचा 38 धावात खुर्दा पाडणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे आज होणार सामना नेहमीप्रमाणे काँटे की टक्कर ठरणार यांत शंका नाही.


2. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून मुंबईत एका संशयितला अटक,  गणेशोत्सवादरम्यान मोठी कारवाई, आरोपी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय


3. दसरा मेळाव्यावरुन संघर्ष सुरु असतानाच आता ठाण्यातील टेंभीनाक्यातील नवरात्रीला राजकीय रंग, आधी केदार दिघे नंतर एकनाथ शिंदेंकडून पाटपूजन 


4. ज्याचा पहिला अर्ज त्याला परवानगी द्या, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा युक्तिवाद, तर स्थानिक आमदारांच्या अर्जाला प्रधान्य देण्याची शिंदे गटाची मागणी


5. दैनिक सामनातून भाजपचा उल्लेख  कमळाबाई केल्याने आशिष शेलार भडकले, तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणू का?, शेलारांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र 


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 04 सप्टेंबर 2022 : रविवार



6. असदुद्दीन ओवैसींचं अमित शाह आणि केसीआर यांना पत्र, 17 सप्टेंबरला राष्ट्रीय एकता दिवस, मराठवाडा आणि तेलंगणा मुक्ती दिन साजरा करण्याची मागणी  


7. महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचं  आंदोलन, राहुल गांधींच्या नेतृत्त्वात मोदी सरकारविरोधात हल्लाबोल


8. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्यसेवेचं भयाण वास्तव, रस्त्याच्या दुर्दशेमुळे झोळीतून नेतानाच गर्भवती महिलेची प्रसूती, नवजात बालकाने गमावला जीव


9. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गणपती पावला; तिन्ही मार्गांवर ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर मात्र सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक 


10. आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, प्रमुख विसर्जनस्थळी चोख व्यवस्था, पर्यावरणपूरक विसर्जनाचं आवाहन