Shikhar Shinganapur Yatra : लाखो भविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर (Shikhar Shinganapur) येथील शंभु महादेव यात्रेचा (Yatra) आज मुख्य दिवस आहे. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत. हजारोंच्या संख्येने कावडी गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याचं गडावर झाला. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे.


डोंगरावर कावडी चढवण्याचा मोठा थरार 


शंभु महादेव यात्रेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात. हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणारा असतो. या कावडीमध्ये महत्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड. गडावर कावडी नाचवत मंदिरच्या दरवाज्याला टेकवल्या जातात. कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते. दोन लिंग असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिरं मानले जाते.




आंध्र प्रदेशह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान 


या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात. शंभु महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं या राज्यातून भाविक याठिकाणी दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. परंतू, चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौणिमापर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात. चैत्र शुद्ध पंचमीला देवाला हळद लावली जाते. तर अष्टमीला रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो.




शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेव मंदिर


शिखर शिंगणापूर हे फलटण पासून 36 किमी अंतरावर तर नातेपुतेपासून 18 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3200 फूट उंचीवर असलेल्या पर्वत रागांवर हे अतिप्राचीन आणि भव्य असे हेमांडपंथी शिवालय मंदिर अतिशय सुंदर आणि मजबूत अशा तटबंदीसह बांधण्यात आले आहे. देवालयासमोर 4 दगडी अतिउंच अशा दीपमाळा आहेत. मंदिरात जाण्याकरिता तळापासून असलेल्या दगडी पायऱ्या वर दगडी कमानी असून पहिला 16 मीटरचा भव्य दरवाजा शेंडगे दरवाजा म्हणून ओळखला जातो. देवालयाच्या मुख्य दरवाज्याला 'जिजाऊ दरवाजा' असे म्हणतात. शहाजीराजांनी या दरवाजाचे बांधकाम करून घेतले आहे. दरवाजाच्या एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kamada Ekadashi: आज चैत्र शुद्ध एकादशी, अर्थात कामदा एकादशी; हरिहरा भेद नाही सांगणारी यात्रा