मुंबई: मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देण्याचा मुद्दा उफाळून आला आहे. महाराष्ट्रीयन माणसांना आम्ही इमारतीमध्ये कार्यालय देत नाही असं सांगून त्या इमारतीतल्या गुजराती व्यक्तींनी इमारतीमध्ये भाड्यानं देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मुलुंडमधील घटनेवरुन शिवसेना आणि मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधत साधला. आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील टीका करत एवढा माज कोठून आला? असा सवाल शिंदे सरकारला केला आहे.
मुलुंडमधील घटनेची शिवसेन उद्धव ठकरे गटाकडून दखल घेण्यात आली आहे. मराठी माणसाला घर देण्यास मनाई करणाऱ्यांमध्ये हा एवढा माज कोठून आला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. मराठी माणसाला कार्यालय नाकारण्यात माज कोठून आला.याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महामंडळाने द्यायला हवे. भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत.
मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे.
तृप्ती देवरूखकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. त्या व्यक्तीचे वय पाहता त्याला समजवण्यात आलं आणि माफीही मागायला सांगितली. माझी चूक झाली, मी मराठी माणसाची माफी मागतो असं तो व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसतोय. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे मुंबईत मराठी पाट्या लावाव्यात असे निर्देश न्यायालयाने दिले असताना दुसरीकडे मराठी माणसांना मात्र परप्रांतियांकडून दुकाने भाड्याने दिली जात नसल्याचे वास्तव समोर आले.
हे ही वाचा :