मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. राजा ठाकूर प्रकरणात विद्याधर चिंदरकर यांचा नोंदवण्यात आलेला जबाब खोटा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


मला मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर या गुंडाला सुपारी दिल्याचा विस्फोटक आरोप करणारे पत्र संजय राऊत यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पाठवले. त्यानंतर त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी करून राऊत आणि त्यांचे सहकारी विद्याधर चिंदरकर यांचा जबाब नोंदवला. या जबाबात शाईफेक होण्याची शक्यता आहे, असे चिंदरकर यांनी म्हटल्याने राऊत यांचे आरोप फुसके असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली. त्या टीकेला उत्तर देताना आज राऊत यांनी पुन्हा खळबळजनक आरोप केले. 


संजय  राऊत यांच्या आरोपानंतर एकदाही प्रतिक्रिया न दिलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज अखेर प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी केलेले आरोप खोटे असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीकांत शिंदे म्हणाले, हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. चिंदरकर यांचा जबाब सर्वांसमोर आला आहे.  एकदा म्हणतात जीवे मारण्याची धमकी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात तोंडाला काळे वगैरे फसणार, म्हणजे किती विरोधाभास आहे. मला काळजी वाटते त्यांना स्क्रिझोफेनिया सारखा आजार झाला आहे की काय? एका काल्पनिक विश्वात ते राहत आहेत.  महाराष्ट्रात सकाळची करमणूक होत असल्याने त्यांची गरज आहे.


हा संपूर्ण तपास करत असलेल्या ठाणे पोलीस गुन्हे शाखेने मात्र आपला तपास सुरू ठेवला आहे. हा तपास होत असतानाच संजय राऊत यांच्यावर त्याच ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यांचा तपास देखील ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे.  याआधी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज,   मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर अनेक आरोप केले. पण आजपर्यंत त्यांनी केलेल्या आरोपांवर गुन्हे नोंदवले गेले नाहीत. त्यात आता थेट श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन खळबळ उडाली आहे.


पत्रात संजय राऊत यांनी कोणता आरोप केला?


संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की, आपल्या जीवाला धोका आहे. आपल्याला जीवे मारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nashik Sanjay Raut : साडेतीनशे वर्षांपूर्वी दिल्लीतून संकट आलं होत, पुन्हा महाराष्ट्रावर तेच संकट आलंय, संजय राऊतांचा इशारा