Rohit Pawar On Petrol Disel Rate : पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel) या विषयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी वेळोवेळी आपली मतं मांडली आहेत. यापूर्वीही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास रोहित पवारांनी ठाम विरोध दर्शविला होता. तर आता पेट्रोल-डिझेलबाबत योग्य धोरण राबवलं नाही तर त्याचा सामान्य माणसाला कसा फटका बसतो? यावर ट्विट करत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आपलं मत मांडलंय, त्यांच्या या मतावर नेटकऱ्यांचा देखील प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काय म्हणाले रोहित पवार?


 






 



"याची सर्वाधिक झळ बसते महाराष्ट्रातील जनतेला" - रोहित पवार


रोहित पवारांनी ट्विट करत मत मांडलंय, पोस्टमध्ये ते म्हणतात, "पेट्रोल-डिझेलबाबत योग्य धोरण राबवलं नाही, तर त्याचा सामान्य माणसाला कसा फटका बसतो, हे सध्या बघायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार आज पेट्रोलचा दर 81 रुपयांपेक्षाही कमी असायला हवा, परंतु आपल्याला 105 रु लिटर म्हणजेच लिटरमागे 24 रुपये जादा द्यावे लागतात. याची सर्वाधिक झळ बसते महाराष्ट्रातील जनतेला. कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असतानाही केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेला ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात पेट्रोल-डिझेलसाठी 6096 कोटी रूपये जास्त मोजावे लागले.


 






 


"दर कमी केले नाही तर...." रोहित पवार म्हणतात...
रोहित पवार म्हणतात, आताही दर कमी केले नाही तर केवळ डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेला 2519 कोटी रूपये जास्त मोजावे लागतील. म्हणजेच 5 महिन्यात केवळ महाराष्ट्रातून 8000 कोटींपेक्षाही जास्त लूट करण्यात आली आहे. तरीही महाराष्ट्राला ना प्रकल्प मिळत, ना सीमाप्रश्न सुटण्यास मदत होते, ना नैसर्गिक संकटात #NDRF ची मदत मिळते!


 






 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Gujarat Result 2022: भाजपची विक्रमी विजयाकडे वाटचाल, 20 वर्षांपूर्वीचा आपलाच विक्रम मोडणार, काँग्रेसचा धुव्वा