Maharashtra Coronavirus Cases Today: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 859 इतकी झाली आहे. तर मुंबईमध्ये फक्त 192 सक्रिय रुग्ण आहेत. आठ जिल्ह्यामध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही.
108 नव्या रुग्णाची भर -
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 108 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत 7985630 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
आज कुठे किती रुग्ण आढळले?
राज्यात आज 108 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81,34,891 इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये आज 26 रुग्ण आढळले आहेत. ठाणे मनपामध्ये तीन, नवी मुंबई 17, केडीएमसी तीन, मीरा भाईंदर दोन, वसई विरार 1, रायगड 2, पनवेल 1, नाशिक 5, नाशिक मनपा 2, अहमदनगर 1, पुणे 16, पिंपरी चिंचवड 12, सोलापूर 2, कोल्हापूर 3, सांगली चार, जालना 4, अकोला 2, बुलढाणा एक, नागपूर 1 रुग्ण आढळला आहे. लातूर सर्कलमध्ये आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
राज्यातील सक्रिय रुग्णांची स्थिती काय?
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 859 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 300 इतकी आहे. तर मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 192 इतकी आहे. त्याशिवाय ठाणे 138, पालघर 8, रायगड 26, सातारा आणि सांगलीमध्ये प्रत्येकी पाच, कोल्हापूर 11, सोलापूर 17, नाशिक 31, अहमदनगर 8, जळगाव 1, औरंगाबाद 3, जालना 8, लातूर 1, परभणी 2, नांदेड 2, उस्मनाबाद 7, अमरावती एक, अकोला 44, वाशिम 24, बुलढाणा 4, यवतमाळ एक, नागपूर 14, भंडारा तीन, चंद्रपूर एक आणि गडचिरोलीमध्ये दोन सक्रिय रुग्ण आहेत. नंदुरबार, धुळे, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही. पुढील काही दिवस या जिल्ह्यात एकही रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे कोरोनामुक्त होतील.