Maharashtra Omicron Cases : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात दररोज ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 125 नव्या ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. आज नोंद झालेले सर्व रुग्णाचे रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू संस्था  यांनी दिले आहेत.  त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 1730  इतकी झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळले आहेत. नागपूरमध्ये आज 39 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. 

आज आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण -
नागपूर - 39
मुंबई- 24
मीरा भाईंदर-20
पुणे मनपा – 11
अमरावती-9
अकोला-5
पिंपरी चिंचवड – 3
औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर–  प्रत्येकी 2
नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी 1

आजपर्यंत राज्यात  एकूण 1730 ओमायक्रॉनचे रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे  879  रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६५३*

पुणे मनपा  

५३७

पिंपरी चिंचवड

११०

नागपूर

९०

सांगली

५९

ठाणे मनपा

४९

पुणे ग्रामीण

४६

मीरा भाईंदर

२३

कोल्हापूर

१९

१०

 पनवेल आणि अमरावती

प्रत्येकी १८

११

सातारा

१४

१२

 नवी मुंबई

 १३

१३

उस्मानाबाद आणि अकोला

प्रत्येकी ११

१४

कल्याण डोंबिवली

१५

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१६

भिवंडी निजामपूर मनपा आणि औरंगाबाद

प्रत्येकी ५

१७

अहमदनगर

१८

नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर

प्रत्येकी ३

१९

गडचिरोली, नंदुरबार, आणि सोलापूर

प्रत्येकी २

२०

रायगड आणि वर्धा

प्रत्येकी १

 

एकूण

१७३०

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे  आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत