मुंबई : राज्यात आज विक्रमी 2347 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. आज 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे. राज्यात लकोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 33 हजार 53 झाला आहे. पैकी 24 हजार 161 रुग्ण अॅक्टीव असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 73 हजार 239 नमुन्यांपैकी 2 लाख 40 हजार 186 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 33 हजार 56 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 48 हजार 508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 638 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


राज्यात 63 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 38, पुण्यात 9, औरंगाबाद शहरात 6, सोलापूरमध्ये 3, रायगडेमध्ये 3 आणि ठाणे जिल्ह्यात 9, पनवेल शहरात 1, लातूरमध्ये 1, तसेच अमरावती शहरात एकाचा कोरोनाने बळी घेतला.


Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: 20150 (734)
ठाणे : 228 (4)
ठाणे मनपा: 1550 (18)
नवी मुंबई मनपा: 1368 (14)
कल्याण-डोंबिवली मनपा : 520 (6)
उल्हासनगर मनपा : 101
भिवंडी-निजामपूर मनपा: 48 (2)
मीरा भाईंदर मनपा: 300 (4)
पालघर: 61 (2)
वसई विरार मनपा: 359 (11)
रायगड: 239 (5)
पनवेल मनपा: 206 (11)


नाशिक: 105
नाशिक मनपा: 71 (1)
मालेगाव मनपा: 675 (34)
अहमदनगर: 56 (3)
अहमदनगर मनपा: 19
धुळे: 10 (3)
धुळे मनपा: 70 (5)
जळगाव: 193 (26)
जळगाव मनपा: 61 (4)
नंदूरबार: 23 (2)


पुणे: 199 (5)
पुणे मनपा : 3464 (188)
पिंपरी चिंचवड मनपा: 158 (4)
सोलापूर: 9 (1)
सोलापूर मनपा: 364 (24)
सातारा: 131 (2)


कोल्हापूर: 30 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 42
सांगली मिरज कुपवाड मनपा: 8 (1)
सिंधुदुर्ग: 10
रत्नागिरी: 95 (3)


औरंगाबाद: 97
औरंगाबाद मनपा: 842 (31)
जालना: 28
हिंगोली: 96
परभणी: 5 (1)
परभणी मनपा: 1


लातूर: 42 (2)
उस्मानाबाद: 7
बीड: 3
नांदेड: 7
नांदेड मनपा: 62 (4)


अकोला: 28 (1)
अकोला मनपा: 241 (13)
अमरावती: 6 (2)
अमरावती मनपा: 104 (12)
यवतमाळ: 99
बुलढाणा: 30 (1)
वाशिम: 3


नागपूर: 2
नागपूर मनपा: 355 (2)
वर्धा: 2 (1)
भंडारा: 3
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 4


इतर राज्ये: 41 (10)


Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट