मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानी आहे. या सर्व देशांच्या यादीत आपल्या राज्याने महाराष्ट्रानेही जागा मिळवली आहे. महाराष्ट्रात 1 लाख 35 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जगात महाराष्ट्र 17 व्या स्थानी आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित आहेत.
कोरोना बळींच्या संख्येच्या बाबतीतही तिच स्थिती आहे.अनेक देशांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत. महाराष्ट्रात 6 हजार 283 बळी कोरोनाने घेतले आहेत. चीन, पाकिस्तान, टर्की , स्वीडन, हॉलंड, दक्षिण कोरिया, बांग्लादेशपेक्षा जास्त बळी महाराष्ट्रात गेले आहेत.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 933 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 48 हजार 190 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 56.37 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 78 हजार 014 रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात 10 हजार 994 रुग्ण बरे झाले झाले आहेत तर 312 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 11 वर पोहोचली आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,388,153 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 122,610 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 1,111,348 कोरोनाबाधित आहेत तर 51,407 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 42,647 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 305,289 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,657 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 238,720 हजार इतका आहे.
जगात कोणत्या देशात किती रुग्ण
अमेरिका: कोरोनाबाधित- 2,388,153, मृत्यू- 122,610
ब्राझिल: कोरोनाबाधित- 1,111,348, मृत्यू- 51,407
रशिया: कोरोनाबाधित- 592,280, मृत्यू- 8,206
भारत: कोरोनाबाधित- 440,450, मृत्यू- 14,015
यूके: कोरोनाबाधित- 305,289, मृत्यू- 42,647
स्पेन: कोरोनाबाधित- 293,584, मृत्यू- 28,324
पेरू: कोरोनाबाधित- 257,447, मृत्यू- 8,223
चिली: कोरोनाबाधित- 246,963, मृत्यू- 4,502
इटली: कोरोनाबाधित- 238,720, मृत्यू- 34,657
इरान: कोरोनाबाधित- 207,525, मृत्यू- 9,742
दहा देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात 17 व्या स्थानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2020 12:44 PM (IST)
कोरोनाबाधितांच्या संख्येत पहिल्या वीसमध्ये महाराष्ट्रानेही जागा मिळवली आहे. महाराष्ट्रात 1 लाख 35 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जगात महाराष्ट्र 17 व्या स्थानी आहे. आताच्या घडीला महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -