देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली, अजूनही समूह संसर्ग नाही, मुख्य सचिव अजॉय मेहता यांचा दावा, एबीपी माझाच्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य

  2. गलवानमधल्या झटापटीत चीनी कमांडिंग ऑफिसर ठार, जवळपास 20 जवान ठार झाल्याची चीनची कबुली

  3. भारत-चीनसघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्हा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज बैठक, रशियाचे परराष्ट्र मंत्रीही सहभागी होणार

  4. राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकासआघाडीत पुन्हा रस्सीखेच; शिवसेना, काँग्रेस पाच जागांसाठी आग्रही, काल उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात मातोश्रीवर चर्चा

  5. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंवर पहिल्यांदाच गैरव्यवहाराचे आरोप, महापौरांकडून पोलिसात तक्रार; आजच्या महासभेकडे सर्वांचं लक्ष

  6. महाराष्ट्रात काल दिवसभरात 3721 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 1962 रुग्ण कोरोनामुक्त; तर राज्यात 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरू

  7. मुंबईत क्वॉरंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी छेडछाड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,  तर एका आरोपीला अटक

  8. विद्यार्थ्यांना 'फी' साठी तगादा लावू नका, हप्त्यांमध्ये फी भरण्याची सवलत द्या, मुंबई विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयांना आदेश

  9. आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत बुधवारी भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

  10. चंद्रपुरात तीन महिन्यांपूर्वी लग्ल झालेल्या दाम्पत्याचा करुण अंत, गर्भवती पत्नीच्या आत्महत्येनंतर पत्नीच्या सरणावर उडी घेत जीवन संपवलं