Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2024 10:41 PM
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला टायर जाळून सरकारचा निषेध
मराठा आरक्षणावर तात्काळ निर्णय होत नसल्याने बीडच्या चौसाळा येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरला होता मराठा बांधवांनी याच महामार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केलं आणि यावेळी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जणांनी पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची तब्येत खलावली आहे तरी देखील सरकार आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याने मराठा समाजाच्या मनात सरकारच्या विरोधात तीव्र रोष निर्माण झाला असून आता त्याचे पडसाद राज्यभर उमटायला लागले आहेत आणि त्यातच बीड जिल्ह्यामधील चौसाळा येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी दीड तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता

 
रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट

सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट. सिंधुदुर्गात मोठी खळबळ. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे.


 

धनंजय मुंडे भाषणाला उठताच मराठा तरुणांचे आंदोलन
परभणीच्या मानवत शहरांमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा महायुतीचा मेळावा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला धनंजय मुंडे भाषणासाठी उठताच मागे बसलेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या यावेळी धनंजय मुंडे यांनीही  एक मराठा लाख मराठाची घोषणा देत भाषणाला सुरुवात केली व येत्या 20 फेब्रुवारी रोजी सरकारने विशेष अधिवेशन बोलून हा प्रश्न निकाली काढण्याचं सांगितलं दरम्यान या घोषणाबाजीमुळे या मेळाव्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 
धनंजय मुंडे यांचा आव्हाडांवर हल्लाबोल

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत बहुसंख्य आमदार ज्या बाजूला प्रतोद ज्या बाजूला पक्ष देखील त्यांचाच असल्याचे यापूर्वीही निवडणूक आयोगाने सांगितले आहे. बहुसंख्यांक आमदार अजित दादा पवार यांच्या पाठीशी असल्याने राष्ट्रवादीचे खरे अध्यक्ष अजित पवारच आहेत. त्यामुळे हा निकाल स्क्रिप्टेड आहे म्हणणारे म्हणत असतील पण बहुमत ज्याच्याकडे आहे त्यांचाच पक्ष हा निकाल लोकशाहीला धरूनच आहे. 

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग ; आगीत वाहने जळून खाक
भिवंडी शहरालगतच्या ठाकराचा पाडा येथील भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याची घटना घडली आहे. ठाकराचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली. या आगीत भंगार गोदामात साठवलेले काही केमिकल जळत असल्याने ही आग झपाट्याने पसरत नजीकच असलेल्या वाहनतळ व नजीकच्या बंगल्या पर्यंत पोहचली.या घटनेची माहिती मिळताच भिवंडी पालिकेची एक अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.  परंतु तो पर्यंत ही आग पसरत गेली. स्थानिकांनी बंगल्यातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले व त्यानंतर अनेक वाहन उचलून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. या मध्ये एक जीप,दोन ट्रक व चार दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.या ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे आज विझवण्यावर मर्यादा आल्या होत्या .
पौरकार्मिक म्हणून महानगरपालिकेत सेवा बजावलेली महिला झाली महापौर
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या  सविता कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उप महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे  आनंद चव्हाण विजयी झाले.

 

महापौरपदी निवड झालेल्या सविता कांबळे यांनी यापूर्वी पौरकार्मिक म्हणून सेवा बजावली होती.पौरकार्मिक म्हणून जिथे सेवा बजावली तेथेच मानाचे पद मिळवण्याचे भाग्य सविता कांबळे यांना लाभले.शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर म्हणून निवड झालेल्या सविता कांबळे या दलित समाजातील आहेत.महानगरपालिकेत काही काळ पौरकार्मिक म्हणून सेवा बजावल्या नंतर त्यांनी हेल्मेट तयार करण्याच्या कारखान्यात काम केले.त्यानंतर त्यांनी अन्य महिलांना उद्योग मिळवून द्यायच्या उद्देशाने उदबत्ती तयार करण्याचा उद्योग सुरू केला.नंतर २०२१ मध्ये महानगरपालिका निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
विकासकामांसाठी निधी खेचून आणला - गुलाबराव पाटील
यवतमाळच्या नेर येथे शिवसेनेचा जिल्हा पदाधिकारी मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात आयोजित या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पदाधिकारी मेळाव्याला संजय राठोड यांच्या पक्षांतर्गत विरोधक खासदार भावना गवळी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली, तसेच नेर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा गट देखील अनुपस्थित होता. त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन माजी नगरसेवकांना संजय राठोड यांनी गळाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावेळी संजय राठोड यांनी एका पर्यटनस्थळासाठी साडे सातशे कोटी रुपयांचा डल्ला आणला, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने रब्बी पिकांसह बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला

वाशिम जिल्हात आज  झालेल्या अवकाळी पावसाने वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या शेतमालाचा प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र पहावयास मिळालं. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला शेतमाल जमिनीवर असल्याने अवकाळी पावसाने विक्री करिता आणलेला शेतमाल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे.  गेल्या  काही दिवसा पासून  वाशीम बाजार समितीमध्ये   तूर पिकाला चांगला  दर मिळत असल्याने  मोठ्या  प्रमाणात तूर विक्री साठी आणली होती मात्र अवकाळी पावसाने  तूर पिक भिजलं आणि वाहून गेल्याने  झालेल नुकसान वाशीम बाजार समितीने भरून द्यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी  होतंय. 

मनोज जरांगे पाटलांप्रमाणे दिसणाऱ्या हनुमंत मोरेंचे उपोषण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे... त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळे आंदोलन सुरू आहे...अहमदनगरच्या जामखेड तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटलांसारखेच दिसणारे हनुमंत मोरे यांनी देखील उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू केले असल्याचे मोर यांनी सांगितले... जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले देखील उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ब्रिटीश साम्राज्याला अस्मान दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लंडनमध्ये उभारला जाणार

ब्रिटीश साम्राज्याला अस्मान दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लंडनमध्ये उभारला जाणार.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज लॅार्ड मेयर ॲाफ लंडन मायकल मिलेनी यांच्या सोबत महाराष्ट्र आणि लंडन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा झाली.


लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने AI सेंटर सुरू करण्याचा मानस मेयर ॲाफ लंडन यांनी यावेळी व्यक्तं केला.


पर्यावरण, स्वच्छ हवा, AI तंत्रज्ञान या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

हिंगोली जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी





हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार  आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये  चार वाजताच्या सुमारास पावसाने  हजेरी लावली आहे जिल्ह्यातील कान्हेरगावनाका, कान्हारखेडा, कलबुर्गा, फाळेगाव, या भागात जोरदार पाऊस झाला आहे या जोरदार  स्वरूपाच्या झालेल्या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे तर या पावसाचा शेतातील पिकांना मोठा फटाका बसणार आहे कापणीला आलेला गहू कापूस हरभरा यासह भाजीपाला वर्णीय पिकांना या पावसाचा मोठा फटाका बसला आहे  त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे


 

 



 


काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार - पक्ष निरीक्षकांचा दावा

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने नांदेडला पक्ष निरीक्षक पाठवत  स्थितीचा आढावा घेतलाय. पक्ष निरीक्षक शेख युयुफ यांनी नांदेडमध्ये येत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांच्याशी abp माझाचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी बातचीत केली असता चव्हाण यांच्या जाण्यानंतर काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश होतील असा दावा केलाय. त्याचबरोबर  नांदेड लोकसभेची जागा आम्ही जिंकून आणू असा दावा देखील त्यांनी ABP माझाशी बोलताना केलाय. 

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणार्‍या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला मोठी चालना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा आज त्यांनी घेतला.


जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. यामुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार आहे. याशिवाय, नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4643 कोटी रुपये खर्च येणार असून, सिंचनक्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कॅनॉल दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी 5035 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10,000 कोटींची कामे केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15,000 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. आता नव्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल. शिवाय, नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही.

किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोयाबीनसह,कापसाचे पडलेले भाव,प्रलंबित पीक विमा,अनुदान मदत या सर्व प्रश्नांना घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना भेट घेण्यासाठी आलेल्या किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांना मानवत पोलिसांनी ताब्यात घेतले असुन शेतकऱ्यांचे प्रश्न कृषी मंत्र्यांसमोर मांडू न दिल्याने या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज परभणीच्या मानवत दोऱ्यावर असुन विविध कार्यक्रमासह महायुतीचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे.याच वेळी धनंजय मुंडे यांच्या आगमना आधीच मानवत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कापुस घेऊन थांबलेल्या किसान सभेच्या दीपक लिपणे,लिंबाजी कचरे आणि इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचे न ऐकता थेट या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात ठेवले आहे..पोलिसांच्या या कृतीचा किसान सभेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
नितीन देशमुखांनी सुरु केली शेतकरी संघर्ष पदयात्रा
अकोल्यात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी आजपासून जिल्ह्यात शेतकरी संघर्ष पदयात्रा सुरू केलीये.17 दिवसांत ही पदयात्रा जिल्ह्यातील सातही तालुक्यांत जाणारेय. मुर्तिजापूर तालुक्यातील गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा गावातून तापत्या उन्हात आज या पदयात्रेला सुरुवात झालीय. शेतकरी, कार्यकर्ते, नागरिक अणि महिला यांच्यासोबतच भजनीमंडळाचा भगव्या पथाकांसह या यात्रेत सहभाग आहेय. 2 मार्चला अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होणारेय.

 

आमदार देशमुखांनी टाळ वाजवत यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थितांचा उत्साह वाढविलाय. 300 गावांतून जवळपास 400 किलोमीटरचं अंतर ही पदयात्रा कापणारेय. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार तर सोयाबीनला 10 हजार भाव देण्याची मागणी आमदार नितीन देशमुखांनी या यात्रेच्या माध्यमातून केलीय. या यात्रेचा दररोज गावांतच शेतकर्यांच्या बांधावर मुक्काम असणारेय. दरम्यान, 21 फेब्रूवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहेय. 
चुनाभट्टी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा

चुनाभट्टी येथील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयावर पालिकेने हातोडा मारला आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी संतप्त झाले असून पालिका एल विभागासमोर निदर्शने करीत आहे.गेले काही वर्ष वंचित बहुजन आघाडी चे हे कार्यालय होते.इथे लहान मुलांना शिकविले देखील जात असे, जेव्हा तोडक कारवाई झाली तेव्हा तिथे लहान मुले देखील होती, आणि कोणतीही नोटीस न देता हे कार्यालय पाडल्याचा आरोप वंचित चे पदाधिकारी करीत आहेत.या विरोधात पालिका एन विभाग बाहेर वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली असून पालिकेचा निषेद व्यक्त केला जात आहे.

जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आरखड्यातील विकास कामे प्रगतीपथावर
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे 349 कोटी रुपये खर्चाचा पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात 109 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना गती आली असून सध्या जेजुरी गडाची तटबंदी,मुख्य मंदिर,पायरी मार्ग,तसेच शहरातील ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावाचे सुशोभीकरण कामे सुरू आहेत. सहा महिन्यात विकास आराखड्यातील 15 टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ विलास वाहने यांनी सांगितले.. वन विभागाची परवानगी मिळाल्याने आता कडेपठार कडे जाणाऱ्या दोन्ही मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे ही डॉ वाहने यांनी सांगितले.

 
21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन दोन दिवसाचे होणार आहे. 


20 आणि 21 फेब्रुवारीला अधिवेशन होणार 


20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव


तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार


विधिमंडळ सूत्रांची माहिती

जालना-मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी सरकारचे शिष्टमंडळ दाखल

 


शासनाचे प्रतिनिधी संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके उपस्थित. जरांगे यांच्या मागण्यांना अनुसरून शासनाने केलेल्या आजवरच्या कामाची माहिती दिली जात आहे

छापीमारीत संभाजीनगर शहरातील एकाला अटक

महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी विविध संशयितांच्या घरांवर एनआयए ची छापमारी


एनआयएची छत्रपती संभाजीनगर शहरात देखील छापेमारी


छापीमारीत संभाजीनगर शहरातील एकाला अटक


मोहम्मद जोहेब खान नावाच्या व्यक्तीला संभाजीनगरमधून अटक


छापेमारीत इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि काही कागदपत्र NIA  कडून जप्त


मोहम्मद जोहेब खान विरुद्ध मुंबईने एनआयए गुन्हा दाखल 


मोहम्मद जोहेब खान आयएसआयएसच्या संपर्कात होता


दहशतवादी नेटवर्कच्या कारवाया पुढे नेण्यासाठी हिंसक विचारसरणीचा सोशल मीडियावरून करत होता प्रचार

समीर वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

समीर वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा


पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची ईडीकडून हमी


कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी ईडीनं समीर वानखेडेंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केलेा गुन्हा आता दिल्लीला वर्ग केलाय


त्याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय

Nana Patole : आता पीएम केअर फंड बाबत सुद्धा माहिती भाजपने समोर आणावी, नाना पटोलेंचे भाजपवर टीकास्त्र

 


Nana Patole : इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रमाणे जो सर्वोच्च न्यायलायाने जो निर्णय घेतला, त्याचा स्वागत आम्ही काँग्रेस पक्ष करतो


बॉण्ड आपल्या भाजप पक्षाने घेतले ते कशासाठी घेतले हे सुद्धा लपवू नये किती रुपये पैसे यामध्ये आहेत हिशोब द्यावा 


आता पीएम केअर फंड बाबत सुद्धा माहिती समोर आणावी


या पैशाचा उपयोग कसा झाला हे समोर आणावं


या बाबत सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सूचना कराव्यात अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करतो

Ashok Chavan : राजकीय आयुष्यातील एक नवी सुरुवात मी करतोय, अशोक चव्हाणांनी दाखल केला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज

Ashok Chavan : आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मी दाखल केला आहे


मी भाजप वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो


सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे


राजकीय आयुष्यातील एक नवी सुरुवात मी करत आहे


कोण कुठे होत यापेक्षा आज कोण कुठे आहे हे महत्वाचा


आज आम्ही महायुती मध्ये आहोत आणि महायुती राज्यसभा उमेदवार आहोत

Sushma Andhare : आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारून घेऊ शकतो का? घोसाळकर हत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare : मुंबई दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत शिवसेना उपनेत्या यांनी सुषमा अंधारेंचा सवाल


घोसाळकरांची हत्या करून मॉरिस याने देखील आत्महत्या केली, आता आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारून घेऊ शकतो का? 


या हत्येमध्ये वेगळंच काहीतरी असण्याची शक्यता बोलून दाखवली आहे... 


हत्या करण्याआधी फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस आणि घोसाळकर यांच्या भोवती मृत्यूच सावट दिसत नाही, 


कदाचित घोसाळकरची हत्या मॉरिसनी केलेली ही नसावी 


कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये मेहुल नावाचा व्यक्ती देखील दिसत आहे 


या हत्येच्या संबंधी अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित असतानाच गृह विभागावर निशाणा साधला आहे.


 


 

Ujjwal Nikam : शरद पवार गटाने ती एक गोष्ट केली असती तर कदाचित..., उज्ज्वल निकम काय म्हणाले?

Ujjwal Nikam : ''शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्षेप घेत 


सर्वोच्च न्यायालयात जाऊन निकालावर स्थगिती आणली असती तर 


आज कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळाले असते'', असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.


केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निकाल देत घड्याळ हे चिन्हही त्यांना बहाल केले होते


अजितदादा गट Vs शरद पवार गटाच्या विधानसभाध्यक्षांसमोरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Rohini Khadse : ...त्यावेळी त्या आईची जी अवस्था होते, ती अवस्था शरद पवार यांची झालीय

Rohini Khadse : पक्षाचा बाबत जे घडलं ते योग्य नाही. अनेक महीला फोन करत आहेत आणि पाठींबा दर्शवत आहेत. एखाद्या आईने बाळाला जन्म घातल्या नंतर ते बाळ सुट्टीला आपल्याकडे आत्त्याकडे जातं आणि त्या आत्त्याने हे बाळ माझं आहे म्हणुन कोर्टात दावा केला. त्यावेळीं त्या आईची जी अवस्था होतें ती अवस्था शरद पवार यांची झाली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला ही बाब पटलेली नाही. असं रोहिणी खडसेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं


सर्व भगिनींनी मला सांगितल काही झालं तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत हे त्यांना सांगायचं आहे म्हणुन हा एमएमआर रिजनचा मेळावा आयोजित केला.


चूल आणि मूल यातून बाहेर काढण्याच काम शरद पवार यांनी केली. पाण्याच्या नळावरुन झेंड्याची दोरी हातात देण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. 


 

Garlic Price Hike : लसणाच्या दरात मोठी वाढ, प्रतिकिलो लसणासाठी मोजावे लागतायेत 600 रुपये

Garlic Price Hike : देशातील बहुतांश बाजारपेठेत लसून 500 ते 600 रुपये प्रतिकिलो दरानं विकाला जातोय. 


चीनसह तुर्कस्तानसह इतर देशांमध्येही लसणाच्या दरात वाढ झाली आहे.


वाशी एपीएमसीमध्ये लसणाचे दर हे 600 रुपयांच्या आसपास आहेत.


10 मार्चपर्यंत बाजारात लसणाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 


सध्या काही ठिकाणी बाजारात लसूण 400 ते 500 रुपये किलो दराने विकला जात आहे


 

Ahmednagar : पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न

Ahmednagar : पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न
पारनेर येथील हॉटेल दिग्विजय जवळील घटना
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली घटना
आरोपी अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती
आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस चौकशी सुरू

Buldhana : महिलांशी असभ्य वर्तन करून फोटो काढणाऱ्याला महिलांनी दिला चोप, नंतर घातला चपलेचा हार...

Buldhana : महिलांशी असभ्य वर्तन करून फोटो काढणाऱ्याला महिलांनी दिला चोप, घातला चपलेचा हार...


शेगाव येथील दोन दिवसांपूर्वीची घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...


हा व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील असून त्याचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे.


महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता, 


मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या, 


एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चोप देत चपलेचा हार टाकून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेले, 


पुन्हा अशी चुकी करणार नाही असे स्टॅम्प पेपर वर लिहून हे प्रकरण आपसात केल्याची माहिती मिळाली आहे, 


मात्र हे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.


शेगाव पोलिसात या व्यक्ती विरुद्ध आता विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.


 

Dharmababa Atram : आजचा राष्ट्रवादी संदर्भातील निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागेल, धर्माबाबा आत्राम यांचा दावा

Dharmababa Atram : आजचा राष्ट्रवादी संदर्भात निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागेल असा दावा मंत्री धर्माबाबा आत्राम यांनी केली.


शरद पवार यांनी आपला गट काँग्रेस मध्ये विलीन करण्यापेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात विलीन करावा. आम्ही  शरद पवार यांना मान सन्मान देऊ


शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन केला, तर शरद पवारांचे राजकारण संपून जाईल असे हि धर्माबाबा आत्राम म्हणाले


प्रफुल पटेल हे राज्यसभा निवडणूक लढत असले तरी विदर्भात आमचा भंडारा-गोंदिया, गडचिरोली व वर्धा  विदर्भात या तीन लोकसभेवर दावा कायम असल्याचे धर्माबाबा आत्राम म्हणाले

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती अतिशय नाजूक, पाणी घेण्यासाठी जोरदार आग्रह

Manoj Jarange : मनोज जरांगे यांना आज पाणी घेण्यासाठी जोरदार आग्रह
सहकारी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या कडून जरांगे यांना विनंती होत आहे
त्यानंतर मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतले
आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या अग्रहांने पाणी घेतले


 

Jitendra Awhad : सुप्रीम कोर्ट कधीही राजकिय निर्णय घेत नाही, ते संविधानाच्या कायद्यानुसार निर्णय घेतात

Jitendra Awhad : सुप्रीम कोर्ट कधीही राजकिय निर्णय घेत नाही, ते संविधानाच्या कायद्यानुसार निर्णय घेतात


आता देशाला कळेल कोणाला कुठून पैसे आले कोणाला कंत्राट आले
 
विरोधीपक्षाला दिले की कसा दम दिले जातात


काल अजित पवार काल म्हणाले जाॅर्ज फर्नांडिस पापापा बोलले


अजित पवार यांना इतिहास कळत नाही. फर्नांडिस यांची ती पहिली निवडणूक होती


अजित पवार यांना कोणतरी कानात येऊन सांगतो आणि ते बोलतात.


पाकिस्तानात काय झालं पाहिलं ना ? इम्रान खानचे उम्दवार अपक्ष उभे राहिले निवडून आले पण सतेत गेले


पाकिस्तानमध्ये लोकं लोकशाही हवी आहे तर हा महाराष्ट्र आहे.


कोणाला पक्ष चोरलेला आवडलेलं नाही


महाराष्ट्र खूप वेगळा आहे त्याचं वाटोळं करण्याचं काम निवडणूक आयोग अध्यक्ष आणि भाजप व अजित पवार यांनी केलं


 


 


 


 


 

Chhatrapati Sambhaji Nagar : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखला

Chhatrapati Sambhaji Nagar : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखला


मराठा समाजाने आळंदी येथे रोखून धरला महामार्ग


अधिसूचनेच कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्यावर जरांगे पाटील ठाम आहे


त्यांच्या याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील


संभाजीनगर जळगाव महामार्ग आळंदी येथे मराठा समाज आणि ग्रामस्थांनी रोखून धरला.


आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी आग्रही मागणी यावेळेस आंदोलन करतांनी केली.


महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक कोंडी देखील दिसून आली.

Nilesh Rane : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची उद्या भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे जाहीर सभा

Nilesh Rane : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची उद्या भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आहे.. 


या सभेच्या निमित्ताने निलेश राणे याचे बॅनर मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे लावण्यात आले आहेत..


विषेश म्हणजे या बॅनरवर टायगर इस  कम बॅक असे लिहण्यात आले असून भास्कर जाधवांच्या कार्यालयाजवळ लावले आहेत..


या सभेसाठी तळकोकण,कोकणातून जवळपास साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत.. 


भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील अकरा वर्षापासूनचा राजकिय संघर्ष पाहायला मिळतोय.. 

Rohini Khadse : अजित पवारांच्या काका, का? वक्तव्यावर रोहिणी खडसेंचे चोख प्रत्युत्तर

Rohini Khadse : पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे, आता 'काकाका' असे लिहून प्रचार केला पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटलंय. 


अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाच आव्हान देण्यास सुरुवात


अजित पवारांवर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका


अजित पवार यांच्या काकाका वक्तव्यावरून रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर


महिला धोरण लागू कोणी केलं? काकांनी केलं. 


राजकारणात खांद्याला खांदा लावून महिला आज कुणामुळे काम करत आहेत? 


महिला आयोगाची स्थापना कोणी केली? 


संरक्षण दलात महिला कोणामुळे काम करत आहेत, काकांमुळे करत आहेत. म्हणून काकाच हवे आहेत

Election : अशोक चव्हाण यांची कन्याही मैदानात, भोकरमधून विधानसभा लढण्याची चिन्हं

Sreejaya Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित


अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल होत असताना, त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती


कन्या श्रीजया चव्हाण यांना विधानसभेचं तिकीट देणं ही होती अशी सूत्रांची माहिती


त्यानुसार आता श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Pune Crime News : आंदेकर टोळीतील आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

Pune : येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.


येरवडा कारागृहातील मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं शेरखान पठाण असं नाव आहे

Ashish Shelar on Uddhav Thackeray : ''हे तर सरकार न चालवू शकणारे मुख्यमंत्री''

Ashish Shelar Tweet : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. ''हे तर सरकार न चालवू शकणारे मुख्यमंत्री...! पक्ष न सांभाळू शकणारे पक्ष प्रमुख..! कुटुंबात उभी फुट पाडणारे  कुटुंब प्रमुख...? देवेंद्रजींना फोडणवीस म्हणणाऱ्यांना जनतेने मग काय? उध्दवस्तजी म्हणायचे की, उद्धटजी म्हणायचे?'' असं ट्वीट आशिष शेलारांनी केलं आहे.

Solapur : मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाला आक्षेप

Solapur : मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाला आक्षेप


सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सुट्टी न देता परीक्षा ठेवल्याने आक्षेप


सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजी चा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेना हा पेपर बंद पाडण्याचा ईशारा 


सीबीएसई बोर्डाने 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.


19 फेब्रुवारी रोजी दहावी बोर्डाच्या वेळापत्रकात संस्कृत यां विषयाचा पेपर घेण्यात आला आहे.


याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे.

Sanjay Raut : 'मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत', संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

Sanjay Raut On Farmer Protest : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मोदी सरकारर निशाणा साधलाय. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीशांनीही अशी दमनशाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरूद्ध करत आहेत. स्वातंत्र्यकाळात सुद्धा आंदोलने झाली, लाला लजपतराय ज्यांचे नेते होते, ब्रिटीशांनी केलेल्या लाठीमारात लालालजपतरायांचं निधन झालं, मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं, आता सुद्धा मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोगोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे

Sanjay Raut : 'मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत', संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

Sanjay Raut On Farmer Protest : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मोदी सरकारर निशाणा साधलाय. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीशांनीही अशी दमनशाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरूद्ध करत आहेत. स्वातंत्र्यकाळात सुद्धा आंदोलने झाली, लाला लजपतराय ज्यांचे नेते होते, ब्रिटीशांनी केलेल्या लाठीमारात लालालजपतरायांचं निधन झालं, मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं, आता सुद्धा मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोगोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे

Farmers Protest : शेतकरी-केंद्र सरकारमध्ये आज होणार बैठक, सात दिवसांतील तिसरी बैठक, मागण्या मान्य न झाल्यास घेणार आक्रमक पवित्रा

Farmers Protest 2.0 : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा (Farmers Protest) आज तिसरा दिवस आहे. मंगळवारी शंभू सीमेवर झालेल्या गोंधळानंतर आजही तणावाची स्थिती कायम आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं ठरलंय. तोपर्यंत पुढे न जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Babanrao Gholap : मोठी बातमी! माजी मंत्री बबनराव घोलप ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र, शिंदे गटाच्या वाटेवर

Babanrao Gholap नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटाला आज 'जय महाराष्ट्र' करणार आहेत. आज ते आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटात नाराज असलेले बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर असून ठाकरे गटाला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत. 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्यापासून धाराशिव दौऱ्यावर, जनसंवाद मेळाव्यातून तोफ धडाडणार

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या दि. 16 व दि. 17 धाराशिव (Dharashiv) दौऱ्यावर येणार आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे यांचे कल्याण, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर, शिर्डी लोकसभा दौरे पार पडले आहेत. त्यानंतर आता ते धाराशिव येथे दौरा करणार आहेत. 

Income Tax : राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांना आयकर विभागाचा झटका, कर चुकवणाऱ्यांची होणार अडचण

Income Tax Notice: राजकीय पक्षांना (Political parties) देणगी (donate) देणाऱ्यांना आयकर विभागानं (Income tax) झटका दिला आहे. आयकर वाचवण्यासाठी बोगस राजकीय पक्षांना देणग्या दिल्याचा संशय असलेल्या अनेक करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळं राजकीय पक्षांच्या नावाने कर चुकविणाऱ्यांची अडचण होणार आहे. आयकर विभागाला करदात्यांनी देणगीच्या तरतुदीचा कर चुकवण्यासाठी किंवा निधीचा गैरवापर करण्यासाठी गैरवापर केल्याचा संशय आहे. त्यामुळं या नोटीसा बजावल्या आहेत

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सनं ओलांडला 72 हजारांचा टप्पा तर निफ्टी 21900 च्या वर

Stock Market Opening : आज सुरुवातीलाच शेअर बाजारात (Stock market) चांगली तेजी असल्याचं पाहायला मिळालं. काल संध्याकाळी बाजारात दिसून आलेला तेजीचा कल आजही कायम आहे. सेन्सेक्सने 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टी 21900 च्या वर उघडला आहे. तर बँक निफ्टीने 46000 चा टप्पा ओलांडला आहे.

Weather Update : राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात (Maharashtra) सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुणे (Pune) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे


 

Mumbai Water Cut : मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीची शक्यता

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीला (Water Cut) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीकपातीला सामोरे जावं लागणार असल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला पाणी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

Sangli News : मिरजेत नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Miraj Nursing University : मिरजेत नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 

Bhandara News : भंडाऱ्यातील दोन सख्ख्या भावांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, वर्धा आणि नागपूर कारागृहात रवानगी

भंडारा : भंडारा शहरातील नागरीकांसाठी धोकादायक ठरत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या दोन सख्ख्या भावांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. या दोन भावांची वर्धा आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. फैजान साकीर शेख (22) आणि साहिल साकीर शेख (21) दोन्ही राहणार बाबा मस्तानशहा वॉर्ड भंडारा, असं कारवाई केलेल्या भावांची नावं आहेत. या दोघांवर 2021 पासून भंडारा इथं खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, हत्यार बाळगणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खंडणी अशा प्रकारचे प्रत्येकी 5-5 गुन्हे दाखल आहेत. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 


 

Nagpur Crime News : तडीपार आरोपीचा सिनेस्टाइल पाठलाग करत हत्या

Nagpur News : नागपुरातील हत्येच्या घटनेत वाढ होऊन 1 फेब्रुवारी पासून हत्येची नववी घटना समोर आली आहे. अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी नाईक नगर भागात एका तडीपार गुंडांची हत्या करण्यात आली. सूरज उर्फ ​​बिहारी महतो असे मृतकाचं नाव आहे.  मृतक सूरज उर्फ ​​बिहारी महतो हा तडीपार होता. तर आरोपी विपीन कुमार गुप्ता याच्यावर सुद्धा खुनाचा आरोप होता. आज मृतक सूरज हा काही कामानिमित्त नाईक नगर येथे गेला होता, जेथे आरोपीचे विपीनकुमार गुप्तासोबत भांडण झालं होतं. यावेळी दोघांचा वाद विकोपाला गेला. यावेळी सुरज स्वतःचा बचाव करण्यासाठी एका घरात घुसला, तेव्हा त्याचा पाठलाग करत विपीनने त्याचावर धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. यात विपीनच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, कायद्याने ज्या गुंडाला नागपूर शहरातून तडीपार केले होते, तो नागपूर शहरात राजरोसपणे कसं फिरत होता, या संदर्भात पोलिसांनी मौन बाळगला आहे.

Hingoli News : पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पूर्ण आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जाणार धरणातून पाणी 

हिंगोली : पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे पूर्ण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन शहरांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडून १ दशलक्ष घनमीटर इतके पाणी धरणातून सोडले जाणार असून त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे नदी पात्रात कोणीही उतरू नये जनावरे सोडू नये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी आसा सतर्कतेचा इशारा पूर्ण पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आले आहे

NCP MLA disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल वाचन

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल वाचन होणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल आज दिला जाणार असून याकडे राज्याचे लक्ष आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.