मुंबई :  मुंबईसह  15 महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाल्यानं सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मनसेनं इंजिनाची दिशा बदलली, नंतर झेंडा बदलून हिंदुत्ववादाच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप बरोबर युतीची चर्चाही सुरू झाली. पण भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेने  युतीच्या चर्चेत पडू नका, महापालिका निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, आणि कामाला लागा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 


आज मुंबईतल्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी मनसे समिती स्थापन करणार असून,  त्या समितीवर तिथल्या इच्छुकांचा आणि एकूणच परिस्थिचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी असेल. राज ठाकरे स्वतः लोकसभा क्षेत्रनिहाय मेळावे घेणार आहेत. गेल्या काही निवडणुकांत मनसेला जेमतेम भोपळा फोडण्याइतपतच यश मिळतंय. त्यामुळं महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरणार हे पहावं लागणार आहे


महापालिका  निवडणुकीत मनसे  कोणती रणनीती आखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 2012 च्या निवडणुकीत मनसेनं मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली आणि पुण्यात लक्षवेधी कामगिरी केली होती. नाशिक महापालिकेत तर सत्ताही मिळवली होती. पण 2014 पासून मनसेच्या यशाला उतरती कळा लागली. त्यातून पक्ष अद्यापही सावरलेला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब


Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha