Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात सतत बदल (Climete Change) होत आहे. काही भागात उन्हाचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.


मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम (Kharip Crop News) अडचणीत आल्याचं चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे (Maharashtra Rain Update) लावून बसला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहे, त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. 


 






पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये


जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असलं तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100  मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात. मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.


मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक 


मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजूनही मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झालेलं नाही. त्यामुळे अशात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, तज्ज्ञ देत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Monsoon News: मान्सून रखडला, पेरण्या खोळंबल्या.... राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत, जाणून घ्या कुठे काय परिस्थिती