Maharashtra Rain News : राज्याच्या काही भागात पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, जही राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामान विभागाचा अंदाज.
'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. काल (12 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात तलावाचे स्वरूप आले होते. मुसळधार पावसामुळं कपाशी, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळं शेती मशागतीला ब्रेक लागला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करुन दर्यापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यातील पावसाचा जोर कमी
दरम्यान, सध्या राज्यातील पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस सुरु होता. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. नदी नाले दुथडी भरुन वाहिल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. तसेच चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळं शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढच्या काळात देखील राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता आधीच हवामान विभागानं वर्तवली होती. त्यानुसार राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: