Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी (Rain) लागल्याचे पाहायला मिळत आहे. कुठं जोरदार पाऊस होतोय, तर कुठं मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.


कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आद कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजुला आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  


अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा


दरम्यान, काही भागात जरी जोरदार पाऊस होत असला तरी देखील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. कमी पाऊस असूनसुद्धा काही शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या केल्या आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढवलं आहे. अनेक ठिकाणचे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 


जुलै महिन्यात पडणार चांगला पाऊस


जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथा या भागात निश्चितच चांगला जोरदार पाऊस झाला. परंतु उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूपच कमी होते. दक्षिण भारताचा अपवाद वगळता राज्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले. जून महिन्यात देशातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनसार, जुलै महिन्यात महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 106 टक्के एवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच या जुलै महिन्यात राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Akola News : ऐन पावसाळ्यात जलसंकट अधिक गडद; 1 जुलैपासून 'या' शहराला आठवड्यातून केवळ एक दिवस पाणीपुरवठा