Maharashtra Rain : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain) हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईतही (Mumbai) दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


नागरीकांनी समुद्र किनाऱ्याकडे येणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन


सध्या मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. अद्याप मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेलं नाही. मात्र, पावसाचा जोर जर वाढला तर मात्र पाणी भरण्यास सुरुवात होवू शकते.  वाऱ्याचा वेग ताशी 52 किमी आहे. त्यामुळं समुद्राच्या प्रचंड लाटा आपल्याला बघायला मिळत आहेत. शनिवार आणि रविवारी  असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर याठिकाणी येतील. मात्र, दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी समुद्र किनाऱ्याकडे येणं टाळावं असं आवहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


पावसामुळे ठाणे- घोडबंदर रोड आणि नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा


आज सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने आता पुन्हा बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. काही भागात पाणी साचयला सुरुवात झाली आहे.
तर सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे- घोडबंदर रोड आणि नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा गेल्या आहेत. काही तासापासून वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्या मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, उद्या उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain Update: सतर्कतेचा इशारा! पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट', पावसाचा जोर वाढणार