Buldhana News : पावसाळा सुरु होऊन एक महिना झालं तरी अद्याप राज्यात काही भागात पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळं पाऊस पडावा यासाठी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शेताच्या बांधावरुन मिठाची धुरी सोडली आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव पाऊस पडावा म्हणून हा प्रयोग करत आहेत.हे आदिवासी बांधव शास्त्रीय प्रयोग करत आहेत. याला "धूळपेरणी " अर्थात " क्लाऊड सेडिंग" म्हणतात. धूळ पेरणी म्हणजे आकाशात जमलेल्या ढगांना मिठाची धुरी देणे. मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो असा काहीसा समज आहे.. मात्र याला शास्त्रीय कारण आहे.




कृत्रिम पावसाच्या प्रयोगात ढगांवर  सोडियम क्लोराईड आणि सिल्व्हर आयोडाईड फवारलं जातं


कृत्रिम पावसाच्या प्रयोगात आकाशातील ढगांवर मिठाच पाणी अर्थात सोडियम क्लोराईड आणि सिल्व्हर आयोडाईड याचे मिश्रण असलेलं पाणी विमानातून फवारतात. मिठाच्या कणामध्ये पाणी शोषून घेण्याचे गुणधर्म असल्यानं ढगतील पाणी मिठाचे कण शोषून घेतात. त्यानंतर पाण्याचा थेंब तयार होऊन पाऊस पडतो. मात्र त्यासाठी मिठाच्या पाण्याची फवारणी ढगांवर करावी लागते. शक्यतो विमानातून ढगांवर फवारणी करावी लागते.


जाळात मीठ टाकल्याने त्याचा धूर ढगापर्यंच जाऊन पाऊस पडेल


संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मिठाची धुरी देऊन ढगांना कळ देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करत आहेत. जाळात मीठ टाकल्याने त्याचा धूर काही अशी का होईना ढगांपर्यांत पोहोचून पाऊस पडेल अशी आशा या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची आहे. म्हणून ते ढगांना मिठाची धुरी देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करत आहेत.




बुलढाणा जिल्ह्यातील 90 पेरण्या खोळंबल्या 


खरं तर बांधावरुन मिठाची धुरी देऊन ती किती ढगांपर्यंत पोहोचून पाऊस पडेल यात शंका आहे. मात्र, मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होऊनही बुलढाण्यात या भागात अद्याप पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील 90  पेरण्या अद्याप खोळंबल्या आहेत. त्यामुळं हे शेतकरी असा प्रयोग करत असल्याचं जाणकारांनी सांगितले.


पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांनी शोधली नवीन युक्ती 


पावसाळा सुरु होऊन जवळपास एक  महिना उलटला. मात्र बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांनी एक नवीन युक्ती शोधून ढगांना कळ देऊन पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. मात्र शेताच्या बांधावरुन मिठाची धुरी ढगांपर्यंत किती पोहोचेल हे माहीत नाही. यातून किती पाऊस पडेल हेही साशंक आहे. मात्र या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी आपली आशा सोडली नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : महाराष्ट्र तहानलेलाच, जून महिन्यात फक्त 113.4 मिमी पावसाची नोंद; मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस