Maharashtra Rain Live Updates : राज्यभरात मध्यम पावसाचा अंदाज, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Live Updates : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2022 03:29 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आज पहाटेपासूनच पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात रविवारपासूनच पावसाला सुरुवात झालीय. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पहाटेपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली...More

औरंगाबाद : विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ

कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील गांधीरी नदीवरील नळकांडी पुल वाहुन गेल्याने शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याऱ्या विदयार्थीचा जिव घेणा प्रवास सुरू आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पालकांमध्ये तिव्र नाराजी दिसुन येत आहे. धरणाचा सांडवा या नदीला येऊन मिळतो, तसेच सांडव्याचा पाण्याचा ओघ वाढला की अश्या समस्यांना तोंड दयावा लागते.


सविस्तर बातमी येथे वाचा...