Maharashtra Monsoon Rain LIVE : पुढच्या 5 दिवसात मध्य प्रदेशसह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात चांगला पावसानं दमदार बॅटिंग केली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला पावसाची आस
https://marathi.abplive.com/news/kolhapur/anxiety-has-increased-in-kolhapur-district-due-to-rains-1070237
Meghalaya Rain : मेघालयमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे लुमशॉन्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 6 वरील रस्त्याचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
Monsoon News : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे. पुढील पाच दिवस विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात मात्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक जखमी झाला आहे. झरी जामनी तालुक्यात ही घटना घडली. झरी जामणी तालुक्यातील काही भागामध्ये पाऊस पडला. मुदाठी आणि रजणी येथील दोघांवर वीज कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गजानन पोचीराम टेकाम (रा. मुदाठी) असे विज पडून मृत पावलेल्याचे नाव आहे. तर सोबत असलेले मारोती सुर्यभान टेकाम हे किरकोळ जखमी झाले आहेत. हे दोघे आपल्या शेतामध्ये काम करत असताना ही घटना घडली. तर राजनी येथील निबेश कडू आत्राम (30) शेतात सारणी करत असताना पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. त्यामुळे निबेश हा पावसापासून बचावाकरिता निंबाच्या झाडाखाली थांबला. अशातच विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उरण परिसरात पावसाची हलकी रिपरिप सध्या सुरु आहे.
वाशिम जिल्ह्यात रात्री बऱ्याच भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कुठंतरी एखादी हलकी सर कोसळून पुन्हा ऊन पडत असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात आकाशात ढग दाटून आले असले तरी अपेक्षित असा पाऊस नाही.
Monsoon News : पुढच्या 5 दिवसांत मध्य प्रदेशसह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस होणार आहे. 15 ते 17 जूनच्या दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 19 जून रोजी विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Delhi Rain : देशाची राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसानं दिल्लीत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Chandigarh Rain : चंदीगडमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं उष्णतेमुळं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे.
Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. दरम्यान, मारेगाव तालुक्यातील सालईपोड (खंडणी) येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लक्ष्मण चंदकू टेकाम (53) या आदिवासी शेतकऱ्याचे हे दोन बैल होते. गावालगत असलेल्या गोठ्यावर वीज पडल्यानं बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांची बैलजोडी ठार जाली. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी दगावल्याने शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.
कापूस पेरणीसाठी शेतात गेलेल्या मुलीचा वीज कोसळल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरी कोडापे (16), कोरपना तालुक्यातील बेलगाव येथे ही घटना घडली आहे. ही मुलगी मामाच्या शेतात पेरणीसाठी गेली होती. त्यावेळी घटना घडली. या घटनेत इतर 5 लोक झाले जखमी झाले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे.
यवतमाळमध्ये वीज पडून युवतीचा मृत्यू, पाच जण जखमी
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात इनापुर शेतशिवारात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परिसरातील शेत शिवारात पडलेल्या जोरदार पावसामुळं शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. मात्र, पुसद तालुक्यातील एका 15 वर्षीय युवतीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पल्लवी दिलीप चव्हाण (15) (रा.इनापूर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. तर रविना अनिल चव्हाण (16), आरती सुनिल चव्हाण (16)( रा. इनापूर) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शांताबाई धर्मा चव्हाण (65), देवराव कनीराम चव्हाण (58), रेखा मधुकर राठोड हे तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
खरीप हंगामात आदिवासी बांधवांचे नुकसान, 2 बैलांचा मृत्यू
मारेगाव तालुक्यातील सालईपोड (खंडणी) येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लक्ष्मण चंदकू टेकाम (53) या आदिवासी शेतकऱ्याचे हे दोन बैल होते. गावालगत असलेल्या गोठ्यावर वीज पडल्यानं बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांची बैलजोडी ठार जाली. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी दगावल्याने शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -