Maharashtra Politics: स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसमध्ये गर्दी वाढली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवचैत्यनं निर्माण झालंय. कारण, दीर्घकाळ रखडलेली 18 हजार पदांची पोलीस भरती आणि 75 हजार पदांची शासकीय नोकर भरती निघाली आहे. अनेक नोकऱ्यांच्या संधींची घोषणा झाली आहे. शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी नवा मार्ग स्विकारला. भाजपसोबत यूती करत सत्ता स्थापन केली. आणि जेव्हापासून हे सरकार आलं आहे. तेव्हापासून सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. (eknath shinde and devendra fadnavis)
शिंदे फडणवीस सरकारचे महत्वाचे निर्णय -
बेरोजगार तरुणाईसाठी राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी
जवळपास १८ हजार जागांसाठी पोलीस विभागात भरती जाहीर झाली आहे सध्या अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे
आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर
ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर
लवकरच शिक्षक भरती करण्याचा निर्णय दीपक केसरकर यांनी घेतला आहे
कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला, येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न
भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिलासा
सामाजिक आंदोलन किंवा राजकिय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला
2014 सालातील ईडब्ल्युएस आरक्षणाच्या आधारे नोकरभरती झालेल्या तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या केल्या
पेट्रोल वर 5 रुपये आणि डिझेल वर 3 रुपये कमी करण्याचा निर्णय
सरपंच आणि नगराध्यक्ष निवड जनतेतून करण्याचा निर्णय
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार जाहीर
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांची ठाकरे सरकारने बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू केली
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास मंजुरी
प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवलं, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा भव्य पुतळा प्रतापगडावर उभारणार
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय
धारावीचा रखडलेला पुनर्विकास आता अदाणी समूहामार्फत होणार आहे
दिवाळीच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने शंभर रुपयात आनंदाचा शिधावाटप केला.
दिवाळी सणानिमित्त रेशनिंग दुकानावरती गरजूंना शंभर रुपयात वस्तू मिळणार यासाठी जवळपास500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
महिना अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचे होणारे वेतन दिवाळीनिमित्त 21 तारखेलाच करण्यात आले
केंद्र सरकार प्रमाणेच सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 30 लाख शेतकऱ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपयांची मदत
नैसर्गिक आपत्तीच्या निकषात न बसणाऱ्या सहा लाख शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत
पूर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट आणि तीन हेक्टर पर्यंत मदत नुकसानभर बाई दोन एकराऐवजीतीन हेक्टर पर्यंत केलेले आहे त्यामुळे एन डी आर एफ च्या मदतीपेक्षा दुप्पट मदत होणार
पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने किंमत कमी झाल्या मात्र राज्य सरकार वरती ६ हजारकोटींचा बोजा पडणार आहे
यासोबत काही मोठ्या प्रकल्पांनाही निधी मंजूर करण्यात आलाय.....
नागपुर मेट्रो टप्पा एकसाठी सुधारित खर्च 9279 कोटी रुपयांना मंजुरी
भिवंडी कल्याण शिळफाटा मार्गाचे सहा पदरीकरण 561 कोटी रुपये मंजूर
लोणार सरोवर जतन व संवर्धनासाठी 3७० कोटी रुपये मंजूर
वडसा देसाईगंज गडचिरोली रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा हिस्सा म्हणून 548 कोटी रुपये मंजूर
सूर्रेवाडा उपसा सिंचन भंडारा साठी 336 कोटी रुपये मंजूर
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११हजार 726 कोटी रुपये मंजूर
उस्मानाबाद व बीड सिंचनासाठी ११ हजार 726 कोटी रुपयांना मंजुरी
वर्धा मॅरेज उपसा सिंचन योजनेला 566 कोटी रुपये मंजूर
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी 890 कोटी रुपये मंजूर
जळगाव जिल्ह्यातील वाखूर प्रकल्पासाठी 2288 कोटी रुपये मंजूर
भातसा पाटबंधारे प्रकल्प शहापूर ठाणे साठी 1491 कोटी
नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी 1498 कोटी
दरम्यान, शिंदेंचं सरकार स्थीर राहीलं तर अजून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल..आणि निर्णयाचा असाच वेग राहिला..तर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे-फडणवीसांना त्याचा फायदा होईल. शिवाय जनतेलाही फायदा होईल.