Sushma Andhare on Chitra Wagh : भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरू असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा असा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषणा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
कालपासून समाज माध्यमांवर सर्व स्तरातील लोकांनी योग्यता दाखवल्यानंतरही वाघ बाईंचा थयथयाट काही थांबायचं नाव घेत नाही. उन्मादी वक्तव्य आणि तोच आक्रस्ताळेपणा पुन्हा पुन्हा सुरु आहे. बाई, पाठीशी असणाऱ्या महाशक्तीच्या जोरावरची ही धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा. अत्यंत इमानी इतबारे माणूसपणाच्या मूल्यासाठी लढा देणाऱ्या चळवळीतून मी आले आहे. पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची मी आहे. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही असे अंधारे म्हणाल्या आहेत. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
काल माझं नाव घेऊन अनिल परब बोलले त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी बोलण्याचा संबंध नव्हता. तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्ही कोण? तुमची लायकी काय? तुमचा नेता माझ्याकडे बोट दाखवून माझं नाव घेऊन बोलला, मग मी उत्तर देऊ नको? पण यांना कोणत्याही परिस्थितीतून फक्त घाण काहीतरी काढायचं असतं, अशी टीका वाघ यांनी यावेळी केली. तसेच बाकी विरोधात बोलणाऱ्यांना एकच सांगेन ज्याची जशी लायकी तसा तो विचार करु शकतात अशी टीकाही त्यांनी केली होती. त्या बोलल्या त्यात त्यांची काही चूक नाही, कारण त्यांची लायकीच ती आहे असेही चित्रा वाघ अंधारे यांचं नाव न घेता म्हणल्या.
महत्वाच्या बातम्या:
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप