Maharashtra Potitics: राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षातील एकामागं एक नेते शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. त्यांच्या मुलाखतीतील दहा मुद्द्यांवर एक नजर टाकुयात. 


शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मुलाखातीतील दहा महत्वाचे मुद्दे-


- गेली अडीच वर्षे माझ्यावर अन्याय झाले. शिरूर लोकसभेतील तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि अन्य शासकीय अधिकारी भयभीत होते. ते मला रात्री भेटायला यायचे, त्यांच्यावर राष्ट्रवादीचा दबाव होता.


- 2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती.


- त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला गेला. 


- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्हाला खूप आनंद झाला. आता शिवसैनिकांना मोठी ताकद मिळेल, न्याय मिळेल. पण दुर्दैवानं ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांच्यासोबत आम्हाला मांडीला मांडी लावून बसावं लागलं. तरी आम्ही काही बोललो नाही.


- माझी 3 जूनला शिवसेनेतून हाकालपट्टी झाली. त्यावेळी मनाला खूप वेदना झाल्या. मी आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली. तेंव्हा मी नाराजी उघडपणे व्यक्त केली. कारण अशी हकालपट्टी न पटणारी होती.


- माझी समजूत उद्धव ठाकरेंनी काढली. पण त्याच बैठकीत संजय राऊत यांनी पुणे लोकसभेतून लढायची तयारी करा असं सूचित केलं. उध्दव ठाकरेंनी त्याला दुजोरा दिला. 


- राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेना बळी पडली. संजय राऊत इथं येऊन म्हणाले 2024 मध्ये शिवाजी आढळराव खासदार असतील आणि आता सांगतात की, पुणे लोकसभेतून लढा. राष्ट्रवादीला जागा सोडण्यासाठी त्यांनी असं म्हटलं.


- शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. 


- आत्ताची महाआघाडी 2009 ला स्थापन होणार होती. फक्त शिरूर लोकसभेमुळं ती अडली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती.


- बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवरच शिंदे सरकार चालत आहे. बारा पेक्षा जास्त खासदार स्वतंत्र गट स्थापन करतायेत. तेंव्हा उरल्या सुरलेल्यानी सोबत यावं. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील


हे देखील वाचा-