Eknath Shinde on Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांच्याकडचे लोक रोज येत आहेत. पूर्वी ते आमदार, खासदार, मंत्र्यानांही भेटत नव्हते, आता मात्र गटप्रमुखालाही फोन करतात असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सुधारणा झालेली आहे, मी ऑपरेशन केलं आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


त्यांच्या घरातली डस्टबिन रिकामी झाली याचा त्यांनी विचार करावा. ते बोलतात गेला तो गद्दार, गेला तो कचरा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं. 


ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेत प्रवेश


दापोली मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच प्रवेश केला आहे. योगेश कदम यांना 1 लाख 5 हजार मत मिळाली होती. तर संजय कदम यांना 80 हजार मतं मिळाली होती. आता हे दोन्ही कदम एकत्र आल्याने त्यामुळे तिथे विकासाला चालना मिळेल, शिवसेनेची ताकद वाढेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. शेकडो लोकांनी प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद वाढत आहे. मी सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून संजय कदम हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांन पक्ष प्रवेश केला. 


नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद आणि नागपूरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश स्थिती यावर आपली भूमिका माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना 'तु्म्ही दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांच्यापुढे माफी मागितली असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्यात काय तथ्य आहे,' असा सावाल केला. यावर बोलताना "होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलंच नाही. चला जय हिंद," असं एका वाक्यात उत्तर दिलं. त्यांनी दिलेल्या या खोचक उत्तरानंतर एकच हशा पिकला. 


महत्वाच्या बातम्या:


'होय, तेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या डस्टबीनमध्ये होते' एकनाथ शिंदेंच्या 'त्या' गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!