Uddhav Thackeray : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली होती. अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट न्यायालयानं उघडा पाडल्याचे ठाकरे म्हणाले. हिंदुत्वाच्या नावाखाली दडलेला भाजपचा बिभत्स चेहरा सर्वोच्च न्यायालयानं उघडा पाडला. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही जणांनी आनंद साजरा केला. फटाके फोडले. मी भाजपचे समजू शकतो. पण गद्दारांनी फटाके वाजवण्याचे कारण समजले नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद


महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे. सराकारनं लवकरात लवकर राजीनामा देणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची मागणी आहे की राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजेत ह आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांची निवड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद आहे. राज्यपाल ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.


कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करायचं ते राहुल नार्वेकरांना माहित


विधासभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी जर काही वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून पक्षांतर कसं करायचं ते राहुल नार्वेकरांना माहित असल्याचे म्हणत उद्धव टाकरेंनी टोला लगावला. सध्या अस्तित्वात असलेलं सरकार हे बेकायदेशीर आहे. मी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे. मी माझ्या निर्णयावर समाधानी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा निर्णय दिला आहे. त्यामुळं सर्वांनी आता निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि फैसला सोपवू, जनतेचा कौल स्वीकारु असे उद्धव ठाकरे म्हणाले.


संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी


देशाच्या आणि, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray Will Visit Shirdi: उद्धव ठाकरे सहकुटुंब शनी शिंगणापूर अन् साईबाबांच्या शिर्डी दौऱ्यावर