Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावत आहे. सध्या राज्यातील तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळं पुढील तीन दिवस म्हणजे (14 मे पर्यंत) मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळं अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात तापमानात वाढ होणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सध्या सरासरीइतकं किंवा त्याखाली जाणवत असलेले दिवसाचे कमाल तापमान वाढणार आहे. मात्र, तिथे वातावरण पूर्ववत होऊ शकते असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. मोखा चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) पोर्ट ब्लेअरपासून 500 किमी अंतरावर अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.


राज्यातील कमाल तापमानात वाढ 


पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.  या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोखा चक्रीवादळाचा परिणाम होणार नसल्याने राज्यात अवकाळी पावसाची  शक्यता देखील नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे आज राज्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 
 13 मे रोजी सायंकाळी चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता 


13 मे रोजी सायंकाळी चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता


'मोखा' या चक्रीवादळामुळे बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील सिटवे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमानमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज रात्री या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी सायंकाळी चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 मे रोजी सकाळी वादळाचा जोर ओसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याशिवाय राजस्थानमध्ये 12 ते 13 मे दरम्यान, कोस्टल आंध्र प्रदेशमध्ये 13 ते 15 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारत वगळता इतर सर्वत्र पुढील तीन दिवस कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Forecast: राज्याचा पारा वाढला, अनेक जिल्ह्यात तापमान चाळीशी पार; मोखा चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट