Maharashtra Politicis : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणी  (MLA Disqualification Case) मुंबईनंतर आता नागपुरात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी उद्या (7 डिसेंबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे. नागपूरमध्ये उद्या दुपारी अडीच वाजता ही सुनावणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाची उद्यापासून उलट तपासणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप मामा लांडे यांची उद्या साक्ष  नोंदवली जाणार आहे. 

Continues below advertisement


आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. याप्रकरणी 30 ऑक्टोबरला  सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी पार पडली. त्यावेळीही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वेळापत्रक फेटाळलं होतं. इतकंच नाही तर अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं नाराजी व्यक्त केली. तसेच, सर्वोच्च न्यायालयानं  31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून,सध्या सुनावणी सुरु आहे.