नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास (Winter Assembly Session) उदयापासून  नागपुरात सुरुवात होणार आहे. आगामी निवडणुका (Lok Sabha Election 2024) डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे


उद्धव ठाकरेंनी दिल्यात पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाणार आहे.  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांचा झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकार प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.


मुंबईतील आमदार मुंबईतील सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित करणार


मुंबईतील आमदार मुंबईतील सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित करणार आहेत.  मुंबईतील आमदारांना सामान्य नागरिकांच्या समस्यावर आणि विशेष करून मुंबईतील उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचा रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, फर्निचर घोटाळा व इतर काही महत्त्वाचे घोटाळे समोर आणून राज्य सरकार समोर प्रश्न उपस्थित केले जातील


धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध केला जाणार


धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध केला जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडून केला जाणार असल्याने या निर्णयाला कडाडून विरोध सभागृहात सुद्धा ठाकरे गटाकडून केला जाईल. एकीकडे अधिवेशन सुरू असताना मुंबईत याच धारावी पुनर्विकास प्रकल्प विरोधात ठाकरे गट मोर्चा काढून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. 


आरोग्य विभागाशी संबंधित प्रकरण अधिवेशनात बाहेर आणली जाणार 


आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार होत असल्याचे काही पुरावे सादर करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. 


ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाणार


ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाणार आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण सुद्धा गृह विभाग आणि आरोग्य विभागाला ठाकरे गटातून घेरण्याचा प्रयत्न होणार आहे


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अधिवेशनादरम्यान सहभाग


उद्धव ठाकरे हे 11 किंवा 12 डिसेंबर दरम्यान नागपुरात अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.  तर आदित्य ठाकरे हिवाळी अधिवेशनात पूर्णपणे सहभागी राहून सरकारला या अशा अनेक प्रश्नांवर जाब विचारणार आहे.  


हे ही वाचा :