Rohit Pawar : देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. कारण उद्या ( 3 डिसेंबर) पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल (Election results of five states) जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्याच्या निकालानंतर शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरेसाहेब यांना सोडून गेलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल होणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आज वाशिमच्या कारंगतमध्ये पोहोचली. यावेळी सभेत बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालाविषयी भाष्य केलं.


पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार


उद्या पाच राज्यातील निकाल लागणार आहेत. पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. हे निकाल पाहिल्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या नेते आणि आमदारांमध्ये चलबिचल होणार आहे. मी शरद पवार साहेबांना सांगू इच्छुतो संकटाच्या वेळी जे निष्ठावन सोबत आहेत त्यांचाच विचार आपण करावा असे रोहित पवार म्हणाले. 


काही लोक सोयीचे राजकारण करतात


काही लोकं नाटक करतात. सोयीचे राजकारण करतात. निवडणुका आल्या की 2013 साली देवेंद्र फडणवीस गाडीभर पुरावे घेऊन अधिवेशनात आले होते. बैलगाडीच्या चाकांच्या रेषा दिसल्या मात्र पुरावे दिसले नाहीत, असे म्हणत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. लोक तुमच्या विरोधात बोलतात तेव्हा तुम्ही ईडी सीबीआयची भीती दाखवता. तुमच्याकडे आले की ते दुधासारखे पवित्र होतात असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.  


महत्त्वाच्या बातम्या:


अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजपचा मोठा निर्णय, बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावणार!