Chhagan Bhujbal  : राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे आहे आणि अध्यक्ष कोण हे आजची सभा पाहिली तर लक्षात येईल. पक्षाचे अध्यक्ष  हे अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, दुसरी धनंजय मुंडे, तिसरी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात झाली. पण ज्यावेळी बारामतीचा विषय आला त्यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. अजित पवार नेते आहेत म्हणता तर मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका असेही छगन भुजबळ म्हणाले. 


जयंत पाटील आणि शरद पवार यांना सांगितलं होतं की, पश्चिमीकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवा आणि नशिकमार्गे पाणी मराठवाड्याला आणा असे छगन भुजबळ म्हणाले. हे होऊ शकतं, मी स्वतः मांजरपाडा धरणाचा प्रयोग केला. एक बोगदा पाडला आणि पाणी आणलं. मी शरद पवार यांना सांगितलं परंतू त्यांनी अजिबात ऐकलं नाही असे छगन भुजबळ म्हणाले. 


साहेब गोंदियापासून कोल्हापूर पर्यंत 54 ठिकाणी सर्वांची माफी मागणार का?


साहेब तुमच्याबरोबर जे लोक भाषणं करत आहेत, त्यांना विचारा भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी 54 जणांनी सह्या केल्या. आता जे भाषणं करत आहेत त्यांना विचारा सह्या केल्या की नाही असे ढगन भुजबळ म्हणाले. तुम्ही अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीला जायला सांगितलं. त्यांना वाटाघाटी करायला सांगितले. त्यावेळी मी आणि धनंजय मुंडे नव्हतो असे छगन भुजबळ म्हणाले. माझ्या मतदार संघात आलात त्यावेळी तुम्ही म्हणालात की माफी मागतो की मी भुजबळांना इथून उभं केलं. आता गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत 54 ठिकाणी सर्वांची माफी मागणार का? असा सवाल देखील भुजबळांनी केला. 


काँग्रेसचे नेते मला मुख्यमंत्री करतो म्हमाले होते....


अजितदादांनी पहाटे शपथविधी केला त्यावेळी तुम्हाला म्हणालात गुगली होती. राजकारण अशी गुगली असते का? असा सवाल भुजबळांनी केला. ज्यावेळी माझ्यावर ईडीची कारवाई झाली. प्रॉपर्टी जप्त झाली. माझ्यासकट समीर भुजबळ जेलमध्ये गेला. पण मी घाबरलो नाही. आम्ही तुमच्यासोबत कायम राहिल्याचे भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते मला मुख्यमंत्री करतो असे म्हणाले होते. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका. परंतु मी शरद पवार यांच्यासोबत राहील्याचे छगन भुजबळ म्हणाले. 


तेव्हा माझा राजीनामा का घेतला


23 डिसेबंर 2003 ला मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिली. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. तेलगीला मी अटक केली. काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. तेव्हा तुम्ही मला राजीनामा देण्यास सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. मी तेलगीवर कारवाई केली. तेव्हा झी चॅनलवर दगड पडले, त्यावेळी तुम्ही म्हणालात गोयल यांचा फोन आला आहे. तुम्ही राजीनामा द्या. मुळात ते म्हणाले होते की, भुजबळ यांचा दोष नाही, तरी तुम्ही माझा राजीनामा का घेतला असा सवाल भुजबळांनी केला. 


महत्त्वाच्या बातम्या:


Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्यास छत्रपती संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई