Maharashtra Politicis : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक चालली. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भात ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, काल देखील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. 


आज मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता


गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठका होत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे. रात्री देखील वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. खाते वाटपासंदर्भात अंतिम चर्चेकरीता दोन्ही नेते दाखल झाले होते, अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळं भाजपच्या अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून, कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


विशिष्ठ खात्यांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती


अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी 2 जुलै रोजी मंत्रीपदाची  शपथ घेतली पण अद्यापही या सर्वांचे खातेवाटप झाले नाही. पण या नऊ जणांनी जरी मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अजूनही काही मंत्रिपदं शिल्लक आहेत. त्यामुळे जोपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत खातेवाटप होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप होणार असल्याचं शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Cabinet Expansion : बैठकांचं सत्र सुरू पण खातेवाटपाचं काय? रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा