CM Eknath Shinde Group Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (CM Eknath Shinde) गुवाहाटीला जाण्याचा दौरा निश्चित झाला असून कामाख्या देवीचे दर्शन (Kamakhya Devi Darshan) आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट असे दोन मुख्य कार्यक्रम त्यात असणार आहेत. या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. आधीच ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना पुन्हा एकदा देव दर्शनाला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्री आमदार आणि खासदार जात असल्यानं हा गुवाहाटी दौरा देखील वादग्रस्त होण्याची चिन्हं दिसत आहेत.
नवस फेडण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जातोय - आमदार किशोर पाटील
एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला आम्ही केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने हा नवस फेडण्यासाठी आम्ही 50 आमदार आणि बारा - तेरा खासदार कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.
देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला- शहाजीबापू पाटील
आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) म्हणाले की, देवीला नवस तसा प्रत्येकाने केलाच असणार. पण सगळ्यांनी तो मनात मागितला होता. आता देवीने राज्यात शिंदे सरकार आणल्याने राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले असून देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. आता काय डोंगर काय झाडी होणार नाही, आता काय शिंदे फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके असणार असल्याचा डायलॉगही त्यांनी मारला.
तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे हे त्याच देवीच्या दर्शनाला जात आहेत.
ही बातमी देखील वाचा