Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे आमचे जिवा भावाचे सहकारी आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असेही राऊत म्हणाले. राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे राऊत म्हणाले. 


आमचे काही आमदारांशी संपर्क होत नाही हे खर आहे. ते मुंबईत नाही. काही गैरसमजातून त्यांनी गुजरातला नेण्यात आलं असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेसुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क झाला आहे. जे चित्र बाहेर निर्माण केलं जात आहे की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, ते लवकरच दूर होईल असे राऊत म्हणाले. आता आम्ही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहोत. त्यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संपर्क झाल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, भाजपचा घाव हा छातीवर नसून पाठीवर असल्याचे राऊत म्हणाले.


मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही


महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न करण्याचा डाव आहे. तशा हालचाली सुरु आहेत. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हा पॅटर्न राज्यात चालणार नाही असे राऊत म्हणाले. या पद्धतीनं तुम्हाला किंममेकर होता येणार नाही. याप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. तुम्हाला असा महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवेसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं असे राऊत म्हणाले. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभाव लोढा यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली होती. त्यांची पावले कोणत्या दिशेनं पडत आहेत हे लक्षात घ्या असेही राऊत  म्हणाले. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी फाटाफूट घडवून आणत आहेत. त्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचं कारस्थान सुरु असल्याचे राऊत म्हणाले. 


महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद कधी निर्माण होणार नाही


शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी अवलाद निर्माण होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत: ला विकणारे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद कधी निर्माण होणार नाही असेही राऊत म्हणाले. शिवसेनेतून जे बाहेर पडले त्यांची अवस्था काय आहे हे आपण बघितलं असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. काही आमदारांना गैरसमजातून गुजरातला नेण्यात आलं आहे. आम्हाला काय झालंय ते समजत नाही असे आमदारांचे म्हणणं आहे. त्या आमदारांची व्यवस्था भाजपच्या गुजरात अध्यक्षांनी केली आहे. भूकंपाची भाषा जर कोणी करत असेल तर त्यांना आधी शिवसेनेशी लढावं लागले असे राऊत यावेळी म्हणाले.


 


महत्वाच्या बातम्या: