Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिलीय. तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारीही तुमची असं सांगत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) जरांगेंच्या वकिलांना तंबी दिली आहे. तर सरकार मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक असतांना जनतेला उगाच वेठीस धरु नये, असं आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगेंना केलं आहे. तसेच उद्यापासून होणाऱ्या रास्तारोकोमुळे जनतेची गैरसोय होऊ नये, याबाबत गृहखात्याकडून पोलिसांना सूचना दिल्या जातील. असं शंभुराज देसाईंनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते
'आंदोलन, रास्ता रोकोमुळे 12 वी चे विद्यार्थी, रुग्णांचे हाल होतील" - शंभूराज देसाई
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, आंदोलनं, रास्ता रोको यातून तरुणांचं नुकसान होतं, आणि गुन्हे दाखल झाले की तरुणांच्या पुढच्या भविष्याची दिशा किचकट होते, त्यामुळे आरक्षण प्रश्नी सरकार सकारात्मक असतांना जनतेला उगाच वेठीस धरु नये देसाई म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सगेसोयरे बाबत मागणी केली जातेय, मात्र त्यावर ज्या सूचना हरकती आल्या आहेत, त्यावर कार्यवाही झाली पाहिजे. तसं झालं नाही तर कोर्टात निर्णय चॅलेंज होईल आणि मराठा समाजाचंच नुकसान होईल. असं असतानाही जरांगेंकडून रास्ता रोकोची हाक दिली जातेय. या आंदोलन, रास्ता रोकोमुळे 12 वी चे विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होतील, असं ते म्हणाले
"तरीही आंदोलनाची हाक म्हणजे.."
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय एकमतानं निर्णय घेऊन मंजुर केला, कायदाही पारित झाला. राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आम्हाला सांगायचंय की, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठावाड्यातील ज्या 9 जिल्ह्यांमधील मराठा समाजाबाबत होते, त्याबाबत सरकारनं कार्यवाही केली. त्यानंतर नोंदी सापडल्यास मराठा समाजाबाबतचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याबाबत मागणी केली. ती ही पूर्ण केली. राज्य मागास आयोगाला निधी, यंत्रणा उपलब्ध करुन दिला, गेल्या वेळी अहवालात त्रुटी राहिल्या त्या राहणार नाही, याचीही काळजी घेतली जातेय. इतर कुणाच्याही ताटातलं राढायचं नाही हेही ठरलेलं होतं. मात्र तरीही आता आंदोलनाची हाक म्हणजे उगाच जनतेला वेठीस धरलं जातंय
आंदोलनातील सहकाऱ्यांना जर काही तक्रार करायची असेल तर...
शंभूराज म्हणाले, सरकार कुणावरही ट्रॅप लावत नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहकारी असलेल्यांना जर काही तक्रार करायची असेल तर ती त्यांनी सरकारजवळ जरुर करावी. उद्यापासूनच्या रास्तारोकोमुळे जनतेची गैरसोय होऊ नये याकरता काय उपाययोजना करायच्यात याबाबत गृहखात्याकडून पोलिसांना सूचना दिल्या जातील, असंही ते म्हणालेत.
हेही वाचा>>>