Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 3 मार्चला रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. अन्यथा 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको करणार आहे. यावर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. अकोल्यात ते बोलत होते, मनोज जरांगेंनी जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी. आणि ते निवडून येणार असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. जरांगे जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्य सरकारवर दबाव निर्माण करायचा असेल, तर जरांगेंना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. तरच त्यांचा दबावगट निर्माण होईल. निजामी मराठ्यांनी जसं अण्णासाहेब पाटील, पुरूषोत्तम खेडेकरांना संपवलं अगदी तसंच जरांगेंबाबत होऊ शकतं. म्हणून त्यांनी सावध असावं. असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.


 


महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेबद्दल निर्धास्त - प्रकाश आंबेडकर


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची 27 फेब्रुवारीला मुंबईत बैठक बोलावण्यात आली असून त्यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मात्र या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवले नाही. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नाहीय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटप झाल्यानंतर आपण तिन्ही पक्षांशी जागा वाटपावर चर्चा करणार. आपण महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेबद्दल निर्धास्त आहोत. महाविकास आघाडीसाठी कोणतीही वेळेची मर्यादा घालून दिली नाहीय असं ते म्हणालेत.


 


"नड्डांच्या भेटीची आणि वेळेची पूर्वकल्पना दिली असती तर..."


भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ला भेट दिली होती. नड्डांच्या भेटीची आणि वेळेची पूर्वकल्पना दिली असती तर आपण निश्चितच राजगृहावर त्यांना भेटलो असतो, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं, अशी आपली संस्कृती असल्याचं आंबेडकर म्हणालेत. ते पुढे म्हणाले, 'राजगृह' हे बाबासाहेबांचं स्मारक. तिथे कुणीही येऊ शकतं. काल ते 'राजगृहा'वर आलेत. बंधू भिमराव आंबेडकरांनी त्यांचं स्वागत केलं. संविधान बदलू पाहणाऱ्यांनी शेवटी आपली बाबासाहेब आंबेडकरांवर आस्था असल्याचं दाखवावंच लागतंय. असंही ते यावेळी म्हणाले


हेही वाचा>>>


रोज उठायचं अन् राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करायचं; मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली