Kishori Pednekar : राज्यभरात दिवाळी (Diwali 2022) साजरी होत आहे. तसेच आज भाऊबीज व पाडवा आहे. यानिमित्त ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यंदा भाऊबीजेला एका डोळ्यात हासू, एका डोळ्यात रडू आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्याचं दुःख पण आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
किरीट सोमय्या माझा भाऊ आहे. त्यांनी पक्षाचं काम चोख केलं - किशोरी पेडणेकर
किरीट सोमय्या माझा भाऊ आहे. त्यांनी पक्षाचं काम चोख केलं, तर विरोधी पक्षात रवी राणा माझा भाऊ कधीही नव्हता. अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. शिंदे गटासंदर्भात प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, शुभेच्छा दिल्याच पाहिजे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोऱ्याबाबत..
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या दौऱ्याला जायलाच हवं, सरकार आहे. त्यात ढोल कशाला वाजवून जायला हवं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. हे दोन देव ठरवणारेत की महाराष्ट्रात इलेक्शन कधी होणार. निवडणूक होऊ द्या. मग लोकशाही काय आहे ते दिसेल, असेही त्यांनी म्हटलंय.
संजय राऊतांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार - किशोरी पेडणेकर
संजय राऊतांविषयी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, संजय राऊत आमच्या हृदयात ते कायम आहेत. संजय राऊत यांच्याकडे कायम जाते. याच वर्षी नाही जाणार. पण, ते नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात, पण आज मी त्यांच्या कुटुंबाला नेहमीप्रमाणे जरूर भेटायला जाणार, असे त्यांनी सांगितले आहे.