Maharashtra Politics : शिर्डी (Shirdi) येथील समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्यात(Samruddhi highway) भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचं लोकार्पण केलं. त्यावेळी हे दृश्य पाहायला मिळालं


'समृद्धी' लोकार्पण सोहळ्यात भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर


2014 नंतर 2019 ला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते पदी असताना राधाकृष्ण विखेंच्या पाठिंब्याने शिवसेना पक्षाकडून खासदार सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवला असला तरी आजही या दोन नेत्यांमध्ये श्रेय वादावरून लढाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात जाहीर भाषणात एकमेकांवर टीका करताना मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप खासदार सुजय विखे पाटील तसेच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. अहमदनगरमधल्या समृद्धी महामार्गाच्या कोकमठाणच्या इंटरचेंज येथून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा दाखवण्यात आला. दरम्यान शिर्डी येथील समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्यात भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. 



महाविकास आघाडी सत्तेत असताना बाळासाहेब थोरात यांच ऐकावं लागायचं - सदाशिव लोखंडे


यावेळी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले,  'ड्राय भागात आम्हाला मोठी संधी होती, मात्र या बागायती भागात सगळं अवघड आहे. इथे सगळे कारखानदार असल्यामुळे आम्ही पेरलेलं उगवत नाही. यापूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना बाळासाहेब थोरात यांच ऐकावं लागायचं.. 2014 ला विखे विरोधात होते, त्यानंतर 2019 ला ते जवळ आले, यापुढे आपण एकत्र काम केलं पाहिजे,' असं सदाशिव लोखंडे म्हणाले.


आपण आपले कान पक्के ठेवले पाहिजेत, विखेंचे लोखंडेंना उत्तर
तर राधाकृष्ण विखे यांनी यावर उत्तर देत म्हटलंय, 'आम्ही युतीत नसताना तुमचं काम केलं आहे. लोखंडे साहेब चिंता करू नका, आपल्या जिल्ह्याची समृद्धी कशी येईल हे काम आपण करूया. आपल्या भोवतालचे कार्यकर्ते काहीही सांगतात, मात्र आपण आपले कान पक्के ठेवले पाहिजेत,' असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.


एकमेकांवर टीका


गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही नेते परस्पर दौरे करत असून अनेक कार्यक्रमात एकमेकांना विश्वासात घेत नसल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यानंतर आज मात्र त्यांनी एकमेकांवर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपात असणारा वाद समोर आला आहे हे मात्र नक्की


इतर महत्वाच्या बातम्या


12th December Headlines : भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅली; आज दिवसभरात