Devendra Fadnavis On Maharashtra Politics : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे 103 दिवसांनी जेलबाहेर आले आहेत. यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, राजकीय कटुता संपवण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भूमिकेचं राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलंय. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी राजकीय कटुता, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम, वन नेशन-वन इलेक्शन या महत्वपूर्ण विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले फडणवीस?
...तर संजय राऊतांना भेटणार- देवेंद्र फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हटले, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, मी सर्वांची भेट घेणार आहे. दोन तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत, त्यामुळे त्यांना भेटणार, असं राऊत म्हणाले. तसेच राजकीय कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून स्वागत करण्यात आलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, संजय राऊतांनी भेट मागितली तर त्यांना नक्की भेटणार, राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी सर्वांना मिळून ठरवावं लागेल, कुठलाही एक पक्ष हे ठरवू शकत नाही, आणि नेत्यांनी शांत राहायचं, इतरांना बोलायला लावायचं ही पद्धत बंद करायला हवी असे सांगितले.
'वन नेशन, वन इलेक्शन' वर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासंदर्भात मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) मोठे वक्तव्य केले. 'वन नेशन, वन इलेक्शन' (One Nation One Election) साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. यावर फडणवीस म्हणाले, संपूर्ण देशात वन नेशन, वन इलेक्शन असे झालेच पाहिजे. देशात जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणूक होते, या ऐवजी सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या, तर त्या राज्याचा खर्चही वाचेल, मतदारांना देखील सोयीचे पडेल. राजकीय पक्षांना देखील एक भूमिका घेऊन समोर जावे लागेल
शिवप्रेमींसाठी आज समाधानाची बाब
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून महसूल विभाग, वन विभागाकडून हे पाडकाम करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भातील कारवाई यापूर्वीही सुरू केली होती, पण पुन्हा त्यात काही कायदेशीर अडचणी आल्या होत्या. मात्र आता हे अतिक्रमण काढण्यात येत आहे. शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती, आज त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे.
संबंधित बातम्या